bank. 
नागपूर

भले शाब्बास! त्या कष्टकरी महिलांनी फेडले कोटींचे कर्ज

मनीषा मोहोड

नागपूर : कर्ज बुडविल्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची अवस्था बिकट झाली आहे. अशा कर्जबुडव्यांना आणि बँकांना नागपूर जिल्ह्यातील अशिक्षित, गरीब, कष्टकरी महिलांनी चांगलीच चपराक लावली आहे. गेल्या तीन वर्षांत नागपूर जिल्ह्यातील महिलांनी बँकांच्या 116 कोटींच्या कर्जाची एकही हप्ता न बुडविता परतफेड केली आहे. यासाठी नागपूर जिल्ह्यात तब्बल 154 बँक सखी कार्यरत असून त्या बचतगटातील महिलांना कर्ज घेणे व कर्ज फेडण्यासंदर्भांत मार्गदर्शन करीत आहेत.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान "उमेद' अंतर्गत  महिलांसाठी काम करीत आहे. अभियानाचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील महिलांचे जीवनमान सुधारले पाहिजे, त्यांना त्यांचा हक्काचा रोजगार मिळाला पाहिजे आणि त्या शिक्षित झाल्या पाहिजेत. ग्रामीण भागातील महिलांना स्वयंरोजगार सक्षम बनविण्याचा प्रयत्न आहे. यासाठी जिल्ह्यामध्ये ग्रामीण विकासयंत्रणा काम करते. यामध्ये तालुका व्यवस्थापक, प्रभाग समन्वयक, बँक सखी ही यंत्रणा काम करते. गावागावामध्ये महिला बचतगट तयार करून, त्यांना प्रशिक्षण देण्याबरोबरच स्वयंरोजगारासाठी कर्जपुरवठ्याची सोय आणि त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना विविध प्रदर्शनांच्या माध्यमातून विक्रीची सोय जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून करण्यात येते. आजच्या घडीला नागपूर जिल्ह्यात 8 हजारांच्या जवळपास महिला बचतगट आहेत. यंत्रणेच्या सहकार्यामुळे काही महिला बचतगटांनी सॅनिटरी नॅपकिन, सेंद्रीय खतांची निर्मिती, ज्वेलरी, शर्ट, बॅग, मेणबत्ती, अगरबत्ती व छोटेमोठे गृहोद्योग लावले आहेत.

आर्थिक सक्षमीकरणासाठी प्रयत्न
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून महिलांना आर्थिकद्रुष्ट्या सक्षम करण्यासाठी बचतगटांमार्फत प्रयत्न केले जात आहेत. त्यांना विविध बँकांमार्फत कर्जपुरवठाही केला जातो. कर्ज मिळण्याची प्रक्रिया सुलभतेने व्हावी, यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत नागपूर जिल्ह्यात 154 बँक सखी नेमल्या आहेत.

वर्षनिहाय  कर्जाची परतफेड
वर्ष                कर्जाची परतफेड
2017 - 18       2841 30.93 कोटी
2018 - 19     3287 39. 71 कोटी
2019 - 20       3503 45.46 कोटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT