Mail of school van drivers directly to CM Nagpur auto mail news
Mail of school van drivers directly to CM Nagpur auto mail news 
नागपूर

स्कूल व्हॅन चालकांचा थेट मुख्यमंत्र्यांनाच मेल; केली ही मागणी

राजेश चरपे

नागपूर : वर्षभरापासून स्कूल व्हॅन आणि बस रस्त्यावर उभ्या असून आता फायनान्स कंपन्यांनी कर्ज वसुलीसाठी घरी गुंड पाठवणे सुरू केले आहे. चालकांची आर्थिक अडचण लक्षात घेऊन एक वर्षासाठी आरटीओच्या सर्व करातून माफी द्यावी, अशी विनंती स्कूल व्हॅन चालक संघटनेच्यावतीने ई-मेलच्या माध्यमातून थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे.

मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोना प्रसार होऊ लागताच शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आली होती. तेव्हापासून स्कूलव्हॅन, बसचालक रिकामे बसून आहेत. उदरनिर्वाहासाठी काहींनी भाजीची दुकाने थाटली. गृह उद्योग करून कुटुंबाचे पालनपोषण करीत आहे. दोनचार महिन्यात परिस्‍थिती निवळेल असे वाटत होते. मात्र, ती अधिकच खराब झाली असून, पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे व्हॅनसाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते थकले आहेत.

बँक व खासगी फायनान्स कंपन्या थांबण्यास तयार नाही. खासगी फायनान्स कंपन्यांनी घरी गुंड पाठवून कर्जाच्या परतफेडीसाठी धमकावने सुरू केले आहे. काही चालकांच्या व्हॅन जप्त करण्यात आल्या आहेत. वर्षभरापासून गाड्या रस्त्यावर उभ्या आहेत. त्यात फिटनेस, पासिंग, पीयूसी, विमा इत्यादी करही भरावे लागणार आहे. हे सर्व कर एक वर्षासाठी माफ करून चालकांना दिलासा द्यावा. यासाठी नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत, पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन दिले आहे. सर्वांनी यास सकारात्मक प्रतिसाद दिला.

मुख्यमंत्री कार्यालयाचा प्रतिसाद

वर्षभरासाठी कर माफ करायचा अधिकार मुख्यमंत्र्यांना अधिकार असल्याने आम्ही ई-मेलद्वारे विनंती करीत असल्याचे स्कूल व्हॅन चालक संघटनेचे अध्यक्ष अफसर खान यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने देखील ई-मेल मिळाला असल्याचे कळवून कार्यवाहीसाठी संबंधित विभागाला पाठवण्यात आल्याचे उलटटपाली उत्तरात म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Share Market Opening: शेअर बाजाराची वाढीसह सुरुवात; निफ्टी बँक पुन्हा नवीन विक्रमी उच्चांकावर

Rohit Sharma Birthday : 'सलाम रोहित भाई...' मुंबईने टीम इंडियाच्या कर्णधारचा बड्डे अनोख्या पद्धतीने केला साजरा - Video

VIDEO: वडील असावेत तर असे! घटस्फोट झालेल्या मुलीचे माहेरी केले जंगी स्वागत; व्हिडिओ होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Update : उत्तर मुंबईचे भाजपचे उमेदवार पियुष गोयाल आज भरणार उमेदवारी अर्ज

SCROLL FOR NEXT