makar Sankranti 2023 11 years old child dies after throat cut by nylon manja in nagpur  
नागपूर

Nagpur News : संक्रांत कडू झाली! बापासमोरचं पोटच्या लेकराचा दुर्दैवी अंत; माजांने घेतला बळी

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : राज्यात आज सर्वत्र मकर संक्रांतीचा सण उत्साहात साजरा केला जात आहे. यादरम्यान नागपूर येथे एक वाईट बातमी समोर आली आहे. वडिलांसोबत दुचाकीवरून जात असलेल्या ११ वर्षीय मुलाचा नायलॉन मांजामुळे गळा कापल्याने मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. शहरातील जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही दुर्दैवी घटना घडली.

वेद साहू असे मृत मुलाचे नाव असून शनिवारी सायंकाळी महात्मा गांधी शाळा येथून वडिलांसोबत दुचाकीवर जात होता. रस्त्यात अचानक मांजा आला आणि त्याचा गळा कापला गेला. घटनेनंतर लगेचच त्याला खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. जखम गंभीर होती आणि उपचार मिळायला उशीर झाला.

मांजामुळे गंभीरित्या गळ्याला दुखापत झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता. त्यानंतर त्याच्यावर उपचार सुरु होते. ऐन मकरसंक्रांतीच्या दिवशी सकाळीच ११ वर्षी चिमुरड्याचा मृत्यू झाला. मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती कुटुंबीयांनी दिल्याचं वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष बाकल यांनी दिली

दरम्यान नायलॉन मांजामुळे गळा कापण्याच्या घटना वाढल्या आहेत. अनेक दुचाकीस्वार अशा घटनेत जखमी झाले आहेत. या अपघातांपासून नागरिकांच्या सुरक्षेसाठी नागपूर शहरातील सर्व १२ उड्डाणफुल सकाळी ६ पासून सायंकाळी ६ पर्यंत बंद ठेवण्याता निर्णय घेण्यात आला आहे. पोलिसांनी खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांनो सावधान! होळीसाठी झाडे कापलीत तर १ लाखांचा दंड अन् कायदेशीर कारवाई होणार; नेमका कुणी दिला इशारा?

Navi Mumbai: प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! नवी मुंबई विमानतळावरून ६ शहरांसाठी इंडिगो उड्डाणे सुरू करणार, कोणत्या आणि कधीपासून?

Rohit Shetty Shooting : रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरणात खळबळजनक वळण; नेपाळ कनेक्शन उघड

घरांच्या किमती वाढण्यात नागपूर आघाडीवर; मुंबई-पुण्यालाही टाकलं मागे, या वर्षात तब्बल 'इतक्या' कोटींच्या उलाढालीची शक्यता

Gold Rate: मोठी बातमी! सोन्याच्या किमती २३ हजारांनी वाढण्याची शक्यता; अमेरिका आणि इराण युद्धाचा परिणाम कसा होणार?

SCROLL FOR NEXT