make thank you aashatai campgion all over in maharashtra  
नागपूर

‘थँक्यू आशाताई मोहीम’ राज्यव्यापी करा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे निर्देश 

निलेश डोये

नागपूर : गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आलेली ‘थँक्यू आशाताई मोहीम’ राज्यव्यापी करण्याबाबतचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

नागपूर विभागातील पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉंफ्रेसिंगद्वारे संवाद साधला. या बैठकीला नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, गोंदियाचे पालकमंत्री अनिल देशमुख, चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, वर्ध्याचे पालकमंत्री सुनील केदार, भंडाऱ्याचे पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, यांच्यासह विभागातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी सहभागी झाले होते. 

कोरोना संक्रमणाने महाराष्ट्रात गंभीर रूप धारण केले आहे. अशा परिस्थितीत केवळ कायदे व दंड करून मार्ग निघणार नाही. त्यामुळे घरोघरी आरोग्य साक्षरता निर्माण करणे महत्त्वाचे आहे. यासाठी माझे कुटुंब - माझी जबाबदारी 'मोहीम यशस्वी करायची आहे, असे आवाहन त्यांनी केले.

कायदे व दंड करून यातून मार्ग निघणार नाही. त्यामुळे घरोघरी जाऊन चौकशी करणे, प्रत्येकाची आरोग्य तपासणी करणे, कोरोना विषयक चाचण्यांमध्ये गुणात्मक व संख्यात्मक वाढ करणे, डॉक्टरांसोबत चर्चा करून आरोग्यविषयक सुविधा सुधारणे, आदी बाबींवर लक्ष वेधण्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

आपले स्वप्न कोरोना मुक्त महाराष्ट्र आहे. आगामी काळात सर्वाधिक कोरोना बाधितांचा महाराष्ट्र नव्हे तर कोरोना मुक्त महाराष्ट्र, असे चित्र राज्याचे निर्माण झाले पाहिजे. यासाठीच ही मोहीम आहे. त्यामुळे या मोहिमेसाठी सर्वानी प्रयत्न करावेत, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

Dattatraya Meghe Passes Away: लोकसेवेचा वटवृक्ष निमाला! माजी खासदार, लोकनेते दत्ता मेघे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, विविध क्षेत्रात हाेता दबदबा..

SCROLL FOR NEXT