man attacked on Rikshaw driver by stone in Nagpur  
नागपूर

खुनाच्या घटनेनं पुन्हा हादरली उपराजधानी! भाडं देण्यावरून झाला वाद; प्रवाशानं घातला रिक्षाचालकाच्या डोक्यात दगड 

अनिल कांबळे

नागपूर ः एका ऑटोचालकाची प्रवासाचे भाडे देण्याच्या कारणावरून दोघांनी दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना आज गुरूवारी सकाळी हुडकेश्‍वरमध्ये उघडकीस आली. अनिल हंसराज बर्वे (३२, नवनाथनगर, खरबी) असे खून झालेल्या ऑटोचालकाचे नाव आहे. शहरात गेल्या चार दिवसांतील तिसरे हत्याकांड आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्ग, आऊटर रिंग रोडवर एका तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडून असल्याची माहिती हुडकेश्वर पोलिसांना मिळाली. सूचना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. तरुणाचे डोके अत्यंत निर्दयीपणे दगडाने ठेचण्यात आले होते. जवळच एक मोठा दगड पडलेला होता.

जवळील कागदपत्रावरून पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटविली. अनिल बर्वे अशी ओळख पटली. मात्र अनिलचा खून कोणी केला आणि कशासाठी केला त्याचा सुगावा अद्याप लागलेला नाही. अनिल यांनी ऑटो स्टॅंडवरून प्रवाशी महिला आणि युवकाला ऑटोत बसवले होते. त्यांना घेऊन तो आऊटर रिंग रोडने जात होता. 

भाडे देण्यावरून त्यांच्यात आणि प्रवाशांमध्ये वाद झाला असावा, त्यातूनच अनिलचा खून झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली. पोलिसांनी हत्याकांडाचा गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे. घटनास्थळाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून तपास सुरू आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: बंडखोर खासदारांचे कोणतेही पत्र आलेले नाही; ओम बिर्लांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्याचा दावा

Vilas Ghule Murder Case: विलास घुले हत्या प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन स्थगित; पुरवणी जबाबात खासदारपुत्राचे नाव समाविष्ट

Asim Munir: पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांच्या हत्येचा इस्रायलकडून कट; शोधपत्रकाराचा दावा, दोन देशातल्या मध्यस्थीचं कारण

Latest Marathi News Update: राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Water Tanker Rate Issue : पाणीटंचाईच्या संकटात टँकरच्या दरांची लूट; नागरिकांमध्ये संताप

SCROLL FOR NEXT