man body was buried in a pit after the murder Nagpur Rural Crime News 
नागपूर

खून करून मृतदेहाचे डोक प्लॅस्टिकच्या बोरीत टाकून मानेभोवती गुंडाळली; बोरी उघडताच बसला धक्का

सकाळ डिजिटल टीम

मौदा (जि. नागपूर) : सुमित गणपत यादव (वय २८, रा. सैलाबनगर न्यूकामठी) याचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळला. बारा तासांत मौदा पोलिसांनी आरोपी दीपक अरुण चौधरी (वय ३२, रा. सुरेखा वॉर्ड कामठी), आकाश योगेश नागनवरे (वय १९) व विधीसंघर्ष बालक (वय १८) यांना अटक केली. त्यांनी खून केल्याचे पोलिसांसमोर कबूल केले.

सविस्तर वृत्त असे की, सावळी येथील पोलिस पाटीलांनी मौदा पोलिस ठाण्यात अनोळखी मृतदेह आढळल्याची फोनद्वारे माहिती दिली. मृतदेह बाहेर काढल्यानंतर त्याचे हातपाय व पूर्ण शरीर कुजलेल्या स्थितीत दिसले. मृतदेहाचे डोके प्लॅस्टिकच्या जुन्या बोरीत टाकून बोरी मानेभोवती गुंडाळली होती. बोरी काढल्यानंतर चेहरा कुजलेल्या स्थितीत आढळला.

तपासामध्ये मृताचे नाव सुमित गणपत निष्पन झाले. मौदा सावळी शिवार एनएच ५३ नागपूर-भंडारा रोडच्या उत्तरेस राजू खंडेलवार यांच्या शेताला लागून विजय डोंगरे (वय ३५, रा. रामगड, कुंभारे कॉलोनी) याने सात महिन्यांपूर्वी ढाबा सुरू केला. सुमित दोन महिन्यांपूर्वी ढाब्यावर काम करण्यासाठी आला होता. आरोपी दीपक हा पंधरा दिवसांअगोदर काम करण्यासाठी आला. त्याचप्रमाणे आरोपी आकाश व बाल आरोपी हे दोघेही सावळी फाटाजवळील हल्दीराम कंपनीत मजूर म्हणून काम करीत होते.

एक महिण्यापूर्वी सुमितने दीपकला हॉटेल समोर ठेवलेली राख व पाणी टाकून दे, असे म्हटले होते. त्यावरून दीपकने ‘मी तुझा नोकर आहे काय’, असे म्हटले. यामुळे त्यांच्यात भांडण व मारपीट झाली. दीपकने या घटनेचा राग मनात ठेऊन आकाश व मालकाला सांगितले. ४ मार्चला सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान तिन्ही आरोपी ढाब्यावर आले व क्षुल्लक कारणावरून हाणामारी केली व कायमचा काटा काढण्याचे ठरविले.

५ मार्चला सुमित गाढ झोपेत असताना त्याच्या डोक्यावर पावड्याने वार केला. त्याला जागीच ठार केले. पुरावे नष्ट करण्यासाठी ढाब्याच्या बाजूला राखेमध्ये लपविले. राखेतील मृतदेह उघडा पडेल व बिंग फुटेल या भीतीने तीन दिवसानंतर दीपक व आकाश यांनी राखेमधून मृतदेह काढून रस्त्याच्या बाजूच्या नालीच्या खड्ड्यात गाडला. मृताचे कपडे टायरने जाळले.

मेयोत शवविच्छेदन

उपविभागीय अधिकारी श्याम मदनूरकर, कार्यकारी दंडाधिकारी तरुडकर, वैद्यकीय अधिकारी बिथेरिया यांच्यासमोर मृतदेह काढण्यात आला व मेयो दवाखान्यात शवविच्छेदन करण्यात आले. पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशाने व कामठी उपविभागीय पोलिस अधीक्षक मुख्तार बागवान, मौदा पोलिस निरीक्षक हेमंतकुमार खराबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक साखरकर, पो. कॉं. प्रफुल्ल, केशव फंड यांच्या पथकाने आरोपींना तुमसर (जि भंडारा) येथून ताब्यात घेतले व यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT