नागपूर

वडिलांच्या वर्षश्राद्धाच्या खर्चातून कोरोना बाधितांसाठी व्हेंटिलेटर; नागपुरातील अजित पारसे यांचं कौतुकास्पद पाऊल

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोनांमुळे स्थिती हाताबाहेर गेली असून बधितांसाठी ऑक्सिजन, व्हेंटिलेटर कमी पडत आहे. कोरोनाविरुद्धचा लढ्यात तसेच एकाचा तरी जीव वाचावा, यासाठी सोशल मिडिया विश्लेषक अजित पारसे यांनी वडिलांचे वर्षश्राद्धावरील खर्च टाळून त्या पैशात व्हेंटिलेटर खरेदी केले. ते केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या सुपूर्द करीत बाधितांना समर्पित केले.

जिल्ह्यात दररोज सात हजारपेक्षा जास्त कोरोनाबाधित वाढत आहे. त्यामुळे रुग्णालयात बेड, वेंटिलेटर, ऑक्सिजन या जीवरक्षक बाबीचा तुटवडा पडला आहे. वेळेवर ॲाक्सीजन न मिळाल्याने अनेकांचे जीव जात आहे. जिल्ह्यात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या ७५ हजारांवर गेली आहे. सक्रिय रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने, जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अपुरी पडली आहे. ऑक्सिजन आणि व्हेटिंलेरशिवाय बधितांच्या मृत्यूने व्यथित झालेल्या अजित पारसे यांनी वडील बाळासाहेब पारसे यांच्या वर्षश्राद्ध रद्द केले. वर्षश्राद्धावर होणाऱ्या खर्चाची जी बचत झाली, त्यात आणखी काही पैसे जोडून त्यांनी कोरोना रुग्णांसाठी ‘ॲाक्सीजन ह्युमिडीफायर - व्हेंटिलेटिंग युनिट‘ अर्थात मिनी व्हेंटिलेटर खरेदी केले.

व्हेटिलेटरवर जाण्यापूर्वी ॲाक्सीजन लेव्हल कमी होत असलेल्या कोरोना रुग्णांसाठी हे यंत्र फायद्याचे आहे. सध्या व्हेटिलेटर बेड उपलब्ध नसल्याने या यंत्राची कोरोना रुग्णांना मोठी मदत होणार आहे. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी त्यांच्याकडे हे व्हेंटिलेटर सुपूर्द करून अजित पारसे यांनी कोरोनाबाधितांसाठी समर्पित केले. पारसे यांचा इतरांनीही आदर्श घेतला आरोग्य यंत्रणेला आधार मिळण्याची शक्यता आहे.

वेळेत उपचार आणि व्हेंटिलेटर न मिळाल्याने अनेकांचे मृत्यू झाले. ज्या समाजाने घडविले, त्याबाबत आपलिही जबाबदारी आहे. मी वडील बाळासाहेब पारसे यांच्या वर्षश्राद्धाचा कार्यक्रम रद्द केला. शिवाय काही तडजोड करत ‘ऑक्सिजन ह्युमिडीफायर व्हेंटिलेटिंग युनिट‘ कोरोना रुग्णांसाठी समर्पित केले. हिच माझ्या वडीलांसाठी खरी श्रद्धांजली आहे.
- अजित पारसे, सोशल मीडिया विश्लेषक.

संपादन - अथर्व महांकाळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kanhaiya Kumar: कन्हैया कुमारकडे एवढी आहे संपत्ती; दिल्लीच्या उमेदवारांमध्ये मनोज तिवारी सर्वात श्रीमंत

PM Modi's Advice To Muslims: जगभरातला मुसलमान बदलतोय पण... मुस्लिम धर्मियांना पहिल्यांदाच PM मोदींनी का दिला सल्ला?

Shekhar Suman : शेखर यांच्या मुलाला होता 'हा' गंभीर आजार; लेकाच्या निधनानंतर उचललं गंभीर पाऊल

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी एक वाजेपर्यंत देशात 39.92 टक्के मतदान; महाराष्ट्रात 31.55 टक्के मतदानाची नोंद

बापरे! बॉल समजून पकडला बॉम्ब ... 13 वर्षीय मुलाचा स्फोटात मृत्यू , नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT