Remdesivir  e sakal
नागपूर

रेमडेसिव्हिरसह बेड मिळवून देण्याच्या नावावर फसवणूक, तब्बस दीड लाख हडपले

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोना रुग्णाला (corona patient) रेमडेसिव्हिर (remdesivir injection) आणि व्हेंटिलेटर बेड (ventilator bed) मिळवून देण्याच्या नावावर दोन आरोपींनी एका महिलेची फसवणूक (nagpur fraud) केली. पैशासाठी चक्क रुग्णाच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार सक्करदऱ्यात उघडकीस आला. या प्रकरणी सक्करदरा पोलिसांनी (sakkardara police nagpur) दोन आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. निखिल नरेंद्र आटोले (३५, रा. नवीन सुभेदार) आणि संकेत विलासराव पुरडवार अशी आरोपींची नावे आहेत. (man fraud in the name of getting a bed with remedivir in nagpur)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुदर्शननगर येथे राहणाऱ्या जयश्री रूपेश नंदनवार (३४) यांची सासू लक्ष्मी नंदनवार यांना कोरोना झाला होता. २२ एप्रिल रोजी उपचारासाठी त्यांना सक्करदरा येथील खडतकर हॉस्पिटल येथे भरती केले होते. परंतु, खडतकर हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर नसल्याने लक्ष्मी यांना दुसऱ्या दवाखान्यात हलविण्याची धावपळ सुरू होती. त्याचवेळी आरोपी निखिल हा खडतकर हॉस्पिटलच्या बाहेर उभा होता. नंदनवार कुटुंबीयांची धावपळ पाहून त्याने विचारपूस केली. मी मेडिकलचा जनसंपर्क अधिकारी आहे. तुम्हाला इमामवाडा येथील निरायम हॉस्पिटल येथे व्हेंटिलेटरसह बेड मिळवून देतो, असे आमिष दाखविले. नंदनवार दाम्पत्याचा विश्वास बसावा म्हणून त्यांनी संकेत पुरडवार हा डॉक्टर आहे असे सांगून त्यांना फोन लावून दिला. डॉक्टर म्हणून संकेतने त्यांच्याशी बोलणी करून बेड मिळवून देण्यासाठी दीड लाख रुपये लागतील, असे सांगितले. पुरडवार यांच्या खात्यात पैसे पाठविण्यास सांगितले. नंदनवार यांनी दीड लाख रुपये भरले. त्याचदिवशी सायंकाळी नंदनवार कुटुंबीय निरामय दवाखान्यात गेले असता संकेत नावाचा कुणीही डॉक्टर नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. २८ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता लक्ष्मी यांचा मृत्यू झाला. आपली फसगत झाल्याचे समजताच नंदनवार यांनी पैसे परत मागितले. त्यावर आरोपींनी पैसे देण्यास टाळाटाळ केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या भावात घसरण; आठवड्याच्या पहिल्या दिवशी काय आहे 24 कॅरेट सोन्याचा भाव?

Kolhapur Crime: 'कुरुंदवाडात धारदार शस्त्राने युवकावर सपासप वार'; एकमेकाकडे खुन्नसपणे बघण्याच्या रागातून झाला वाद

Trimbakeshwar : पहिने धबधब्याला पर्यटकांची गर्दी; नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर तुफान कोंडी

Latest Maharashtra News Updates : मरकटवाडीच्या ग्रामस्थांचं विधानभवन बाहेर आंदोलन

Nagpur Crime : निर्माल्य विसर्जनानंतर पतीसोबत काढला 'सेल्फी' अन् महिलेने नदीत मारली उडी; दोघांत असं काय घडलं?

SCROLL FOR NEXT