sumangal pugliya e sakal
नागपूर

चक्क ‘टिशू पेपर’च्या मदतीने मार्केटिंग, तरुणाचा अनोखा फंडा

केतन पळसकर

नागपूर : प्रसिद्धी माणसाची असो किंवा वस्तूची, त्यासाठी प्रत्येक जण नव-नव्या फंड्यांचा शोध घेत असतो. वस्तूच्या जाहिरातीसाठी प्रसिद्धीचा विचार केल्यास बातच काही निराळी. कलकत्ता येथील तरुणाने देखील असाच एक फंडा शोधून काढला आहे आणि तो देखील चक्क टिशू पेपरच्या मदतीने मार्केटिंग (marketing through tissue paper ) करण्याचा. त्याचे नाव आहे सुमंगल पुगलिया.

त्याच्या वडिलांचा स्टॉक मार्केटचा व्यवसाय. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत सुमंगलनेसुद्धा ‘व्यवसायंच करायचा’, असा निश्‍चय महाविद्यालयीन जीवनात केला. मोठे व्यावसायिक आपल्या वस्तू विकण्यासाठी लाखो रुपये खर्च करतात. मात्र, छोट्यात छोट्या व्यावसायिकाचे मार्केटिंगसाठी तितकेसे बजेट नसते. ही बाबत हेरून त्याने आपली वाणिज्य शाखेतील पदवी पूर्ण केल्यानंतर मार्केटिंगच्या जगात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आणि फक्त छोट्या व्यावसायिकांनाच सेवा द्यायची, हा निश्‍चय केला.

प्रत्यक्ष काम करताना जाहिरात, बॅनर या शुल्लक वाटणाऱ्या बाबीदेखील काही व्यावसायिकांना परवडण्यासारख्या नाही, ही बाब सुमंगलच्या निदर्शनास आली. त्यामुळे, मार्केटिंगचे शुल्क अत्यल्प व्हावे या दृष्टीने तो विचार करू लागला. अशातच टिशू पेपरवर व्यवसायाची जाहिरात छापत मार्केटिंग करण्याची युक्ती त्याला सुचली आणि त्याने त्याचे सोने केले. त्याच्या या युक्तीमुळे आज जवळपास दोनशे ते अडीचशे व्यावसायिकांना आपल्या व्यवसायामध्ये फायदा झाला आहे. कलकत्ता, महाराष्ट्रासह ओरिसा, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम या प्रदेशातील छोट्या व्यावसायिकांसाठी त्याच्या पॅसिफिक डिझाईन या कंपनीच्या माध्यमातून तो काम करतो आहे.

स्वत:च तयार करा डिझाइन -

आपल्या वस्तूचे मार्केटिंग करताना आपण स्वत:च डिझाइन तयार करू शकतो. यासाठी सुमंगलने खास www.pacificdesigns.in ही वेबसाइट तयार केली आहे. डिझाइन तयार करण्यासाठी अत्यंत सोपी पद्धत या वेबसाइटवर दिली आहे. शिवाय, काही तयार नमुने निवडूनसुध्दा आपण आपल्या मालासाठी डिझाईन निवडू शकतो.

सुरुवातीला पॅम्पलेटद्वारे छोट्या व्यावसायिकांचे मार्केटिंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, एक ते दीड रुपयांच्या बदल्यात एक पॅम्पलेटसुद्धा काही व्यावसायिकांना खर्चिक वाटत होते. अशा छोट्या व्यावसायिकांना केंद्रस्थानी ठेऊन २५ ते ३० पैशामध्ये मिळणाऱ्या टिशू पेपरद्वारे प्रतिष्ठानाची जाहिरात करण्याची कल्पना सुचली. आज चहाचे आउटलेटपासून ते पंचतारांकित हॉटेल व्यावसायिकपर्यंत सगळे या फंड्याचा लाभ घेत आहेत.
-सुमंगल पुगलिया, संचालक, पॅसिफिक डिझाईन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mira Bhayandar Paryushan Controversy : भाजप आमदारांचा अजब फतवा! विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा-लसूण नको, पर्यूषण पर्व काळात पालकांना शाळेचा मेसेज, राजकीय वाद पेटला

Pune MPSC Student Kidnapping : धक्कादायक! पुण्यात मध्यरात्री MPSC च्या विद्यार्थ्याचे अपहरण; आरोपी काळ्या रंगाच्या गाडीत आले अन्...

Ahilyanagar Crime: अशीही सावकारकी; दोन कोटी कर्जाचे झाले २२ कोटी, दोघांना अटक

Marathi News Live Updates : ओबीसी आंदोलकाच्या गाडीवर भररस्त्यात दगडफेक; हल्ल्याचा थरारक प्रकार कॅमेऱ्यात कैद

अमिताभ बच्चन कौन बनेगा करोडपतीची कार्यक्रम सोडणार? बिग बींनी दिली हिंट, म्हणाले, 'अब मैं रिटायर होना चाहता हूं'

SCROLL FOR NEXT