Man misbehaved with woman and her daughter in Nagpur Latest News  
नागपूर

महिलेच्या घरात घुसून डोक्यावर ठेवली बंदूक अन् केली विचित्र मागणी; घटनेनं परिसरात खळबळ   

अनिल कांबळे

नागपूर ः अभियंत्याने वस्तीत राहणाऱ्या विवाहित महिलेला पिस्तूलाचा धाक दाखवून बलात्कार केला. महिलेशी शारीरिक संबंध प्रस्थापित करताना मोबाईलने अश्‍लील व्हिडिओ आणि फोटो काढले. अश्‍लील फोटो सोशल मिडियावर व्हायरल करून तिच्या मुलीला शारीरिक संबंधासाठी दबाव टाकला. या प्रकरणी कपिलनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. नानक उर्फ बाळू लालताप्रसाद यादव (४३, रा. रमाईनगर, प्लॉट क्र. १०, दुर्गा मंदिरजवळ, कपिलनगर) असे आरोपीचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नानक उर्फ बाळू यादव हा सिव्हिल इंजिनिअर आहे. त्याला तीन मुले आणि पत्नी आहे. त्याच्या घराशेजारी पिडित महिला आरती (बदललेले नाव) राहते. ती विवाहित असून तिला १९ वर्षाची मुलगी आहे. धनाढ्य असलेल्या नानकने विवाहित आरतीशी संपर्क वाढवला. तिच्याशी सलगी केली. तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. 

तिला मोठमोठी स्वप्न दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पत्नी घरी नसल्याची संधी साधून तो आरतीला घरी बोलवत होता. तिला शारीरिक संबंधासाठी दबाव टाकत होता. गेल्या तीन वर्षांपासून त्या दोघांचे प्रेमसंबंध होते. मात्र, बाळूच्या स्वभावात अचानक बदल झाला. त्याने आरतीशी शारीरिक संबंध प्रस्थापित करताना मोबाईलने तिचे नग्न फोटो आणि व्हिडिओ काढले. तो वारंवार तिचे अश्‍लील फोटो काढायला लागला. त्याचे वागणे बघून ती त्याला टाळू लागली. त्यामुळे चिडलेला बाळू तिच्यावर दबाव टाकायला लागला. ४ जानेवारीला त्याने आरतीला घरी बोलावले. तिने त्याच्या घरी येण्यास आणि प्रेमसंबंध कायम ठेवण्यास नकार दिला. त्यामुळे तो तिच्या घरी गेला. तिच्या डोक्याला पिस्टल लावून जीवे मारण्याची धमकी दिली आणि बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. 

मुलीशी संबंधाची मागणी 

आरतीला १८ वर्षाची मुलगी असून ती शिक्षण घेत आहे. बाळूची वाईट नजर तिच्यावर होती. मुलीशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी तिला मानसिकरित्या तयार करण्यासाठी तो आरतीवर दबाव टाकायला लागला. तिने स्पष्टपणे नकार दिला. त्यामुळे त्याने सर्व अश्‍लील फोटो सोशल मिडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. या धमकीमुळे आरती नैराश्‍यात गेली.  

सोशल मिडियावर व्हिडीओ व्हायरल

आरतीने शारीरिक संबंध ठेवण्यास आणि मुलीला तयार न केल्यामुळे चिडलेल्या बाळू यादवने आरतीचे अश्‍लील व्हीडिओ आणि फोटो सोशल मिडियावर व्हायरल केले. तसेच तिच्यासोबत फोनवरून साधलेला अश्‍लील संवादाचे रेकॉर्डींगसुद्धा व्हायरल केले. त्यामुळे वस्तीतील अनेक जणांनी तिला विचारणा केली. बदनामी झाल्यामुळे आरतीने कपीलनगर पोलिस ठाण्यात बाळू यादव विरूद्ध तक्रार दिली.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET SCAM : नीट पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट ! सीबीआयच्या अटकेत असलेल्या मनीषा मांढरे यांचे कॉलेजकडून निलंबन

ITR Update: आयकर विभागाने जारी केले सर्व ITR फॉर्म! तुमच्यासाठी कोणता योग्य? ऑनलाइन रिटर्न कसा भराल? जाणून घ्या

Kerala CM VD Satheesan : कोण आहेत केरळचे नवे मुख्यमंत्री व्ही.डी. सतीशन? 'इतक्या' संपत्तीचे आहेत मालक...

Latest Marathi News Live Update : NEET पेपरफुटीचं प्रकरण तापलं, पुण्यात NSUI कडून आंदोलन, पोलिसांनी कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात

Pune Hospital: माणुसकीला काळिमा! पुण्यातील हॉस्पिटल वाद चिघळला, १३ तासांचे बिल ३.२५ लाख, मृतदेह रोखून धरल्याचा आरोप, राष्ट्रवादीचे नगरसेवक आक्रमक..

SCROLL FOR NEXT