नागपूर

घरपोच ऑक्सिजन पोहोचविणारा 'देवमाणूस'; रमजान काळात रात्रंदिवस दिली सेवा

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कॊरोना काळात(Coronavirus) सगे-सोयरे मदतीसाठी धावून येत नाहीत. नाती दुरावली जातात. या परिस्थितीत दिवसरात्र प्रत्येक गरजूंना ऑक्सिजन सिलिंडर (Oxygen cylinder available), बेड आणि प्रसंगी औषध पोहोचवून देत, त्यांचे प्राण वाचविण्याचे काम युसुफ भाई नावाच्या देवमाणसाने केले आहे.(man providing oxygen cylinders to corona patients in nagpur)

कोरोनाचा दुसऱ्या लाटेत राज्यासह देशात रुग्णाच्या संख्येत दुपटीने वाढ झाली. त्यामुळे रुग्णालयात बेड,ऑक्सिजन सिलिंडर आणि औषधांचा तुटवडा पडू लागला. त्यामुळे मृत्यूच्या आकड्यात झपाट्याने वाढ झाली. रुग्णालयात बेड मिळत नसल्याने अनेकांनी घरीच उपचाराची सोय करण्यास सुरुवात केली. मात्र, ऑक्सिजन वेळेवर मिळेलच याची शाश्वती नव्हती.

अशावेळी एका कॉलवर एक व्यक्ती कोणत्याही वेळी रुग्णांना हवी ती मदत करण्यास तयार असतो. तो व्यक्ती म्हणजे युसुफ उन्नबी खान. गेल्या वर्षभरापासून कोरोनाकाळात ते रुग्णांना निःशुल्क सेवा देत आहेत. दुसऱ्या लाटेत त्यांनी चक्क गरजू आणि पैसे नसलेल्यांना ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करून दिले. आपल्या ऑटोतून ते दररोज किमान १३ ते १४ लोकांना ऑक्सिजन सिलिंडर पोहोचवून देतात. स्वतः फ्लोमिटर लावून इन्स्टॉल करून देतात.

विशेष म्हणजे रमजानच्या काळात त्यांनी दिवसभर रोजे असतानाही त्याची तमा न बाळगता निस्सिमपणे कार्य केले आहे. यादरम्यान त्यांनी स्वतः ३ ते ४ मजल्यावर ऑक्सिजन सिलिंडर नेत रुग्णांचे जीव वाचविले आहेत. इतकेच नव्हे तर ज्यांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. मात्र, नातेवाइकांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यास नाकारले ,अशाचा अंत्यविधीही ते करण्यास मागे हटले नाही. केवळ समाजाची सेवा करणे हीच ईश्वर सेवा असे ते मानतात.

रोजे तोडून दिला प्लाझ्मा

मुस्लिम समुदायात रमजान पवित्र मानल्या जातो. या महिन्यात जवळपास प्रत्येकजण रोजे करीत असतो. युसुफभाई ही त्याला अपवाद नाहीत. मात्र, एकदा कोरोना रुग्णाला प्लाझ्माची नितांत गरज होती. अशावेळी त्यांनी ‘सेवा परमो धर्म’ मानत आपला रोजा तोडून रुग्णाला प्लाझ्मा दान केला. याशिवाय घरी ईद सारखा सण असताना त्यांनी सकाळपासून रात्रीपर्यंत रुग्णांना ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करून दिले. रुग्णाला केलेली मदत हाच धर्म असे अल्ला सांगतो असे ते म्हणतात.

(man providing oxygen cylinders to corona patients in nagpur)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ECI Directs X : भाजपची 'ती' आक्षेपार्ह पोस्ट तातडीनं हटवा! निवडणूक आयोगाचे ट्विटरला आदेश

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गोळीबार करत हल्लेखोर पैसे घेऊन पसार

Suryakumar Yadav Video: प्रेम हे! शतक करत मुंबईला जिंकवल्यानंतर सूर्याचा मैदानातून स्टँडमध्ये बसलेल्या पत्नीला व्हिडिओ कॉल

EVM Hacked: EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये; सापळा रचून दानवेंनी रंगेहाथ पकडलं

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates: भाजपविरोधातील पोस्ट तातडीनं हटवा; निवडणूक आयोगाचे 'X' ला आदेश

SCROLL FOR NEXT