Man took land of old man illegally in Nagpur  
नागपूर

महिलेची घेऊन साथ भूमाफियानं लावली वाट; दृष्टिहीन वृद्धाची हडपली जमीन; नागपुरातील संतापजनक प्रकार 

प्रशांत रॉय

नागपूर : मुलाबाळांना भविष्यात कामी येईल या हेतूने मित्राच्या आग्रहाखातर प्लॉट घेतला. काही वर्षांनी येऊन पाहतो तर काय प्लॉटवर एका महिलेने झोपडीवजा घर बांधलेले. तिला विचारलं तर ती तोऱ्यात म्हणाली याचे पैसे मी प्लॉटच्या मालकाला दिले आहेत. मी म्हटलं, अरे पण प्लॉट तर माझ्या मृत बायकोच्या नावे आहे व तुम्ही मला भेटलाही नाहीत. तर ती उत्तरली मी बक्कळ पैसे मोजून हा प्लॉट खरेदी केला आहे. बाकी मला काही माहित नाही. निघा आता.

६५ ते ७० वर्ष असलेले अंध बन्सपती वर्मा (रा. इंदूर, मध्य प्रदेश) केविलवाण्या स्वरात सांगत होते. बन्सपती यांचे कामानिमित्त नागपूरला नेहमी येणे जाणे होते. मित्राच्या आग्रहाखातर १९८९ मध्ये गोरेवाडा परिसरात १५०० स्क्वेअर फूट प्लॉट घेतला. सदगुरू सरन कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये ९ नंबरच्या प्लॉटची बायकोच्या नावाने रजिस्ट्रीही केली. दरम्यान, इंदूरला स्थायिक झालो. अचानक संकटांची मालिका सुरु झाली. पत्नीचा मृत्यू झाला. 

या संकटातून बाहेर पडतो न पडतो तोच एक दिवस काही दिसेनासे झाले. अनेक उपचार केले परंतु लाभ झाला नाही. घरच्यांनी एका गरीब मुलीसोबत माझे दुसरे लग्न करून दिले. एक मुलगी झाली. पत्नीच रोजंदारी करून घर चालवीत आहे. मुलीच्या पुढील शिक्षणासाठी प्लॉटची विक्री करून पैसे गाठीशी जोडावे यासाठी नागपूरला आलो. एका हितचिंतकासोबत प्लॉटवर गेलो. तेव्हा तेथे एका महिला घर बांधून राहत असल्याचे समजले. तिला याबाबतीत विचारले असता तिने फटकळपणे उत्तर देत परत येथे यायचे नाही असे सांगितले. २०१२ पासून शक्य होईल तसे येथे येतो, विनंती करतो, हातपाय जोडतो मात्र सगळं व्यर्थ.

भूमाफियांचा गनिमी कावा

उपराजधानीत भूमाफिया मोकळे असलेले प्लॉट, भूखयांवर अतिक्रमण करतात. तेथे महिलांना छोटेसे घर बांधून देत प्लॉटची परस्पर दुसऱ्यांना विक्री करतात. प्लॉटचा मालक याबाबत जाब विचारायला गेला की या महिला समोर येतात. भूमाफिया समोर येतच नाही. महिलांविषयी कायदे कठोर असल्याने पोलिसांची उगाच कटकट नको म्हणून आल्यापावली माघारी परतावे लागते. भूमाफियांचा हा गनिमी कावा समजून घेत मुळ प्लॉटधारकांना न्याय मिळावा, असे सामाजिक कार्यकर्ते मलकवाडी म्हणाले.

मध्यस्थांच्या मार्फत बोलणीचा प्रयत्न केला. पोलिसांतही तक्रार केली. मात्र काहीच हाती आले नाही. शासन, प्रशासनाने आम्हा गरिबांचे दुःख जाणून योग्य ती कारवाई करत प्लॉट परत मिळवून द्यावा हीच विनंती आहे.
-बन्सपती वर्मा, 
पीडित प्लॉटधारक 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : उत्तरप्रदेशात मराठी तरुणाला भोजपुरीत बोलण्यासाठी दमदाटी, भाषा येत नाही म्हटल्यावर....पाहा व्हिडीओ

Latest Maharashtra News Live Updates: नांदगावच्या दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान, ग्रामस्थ आनंदीत

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

SCROLL FOR NEXT