नागपूर

Video : उपराजधानी हादरली! बंदुकीच्या धाकावर दोन तास कुटुंब ओलीस; आरोपीला सिनेस्टाईल अटक

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : माउझर हातात घेऊन आरोपी घरात शिरला. जीवे मारण्याची धमकी देत एकाच कुटुंबातील सहा जणांना ओलीस ठेवले. त्यांना सोडण्यासाठी ५० लाखांच्या खंडणीची मागणी केली. पोलिसांनी अगदी कल्पकतेने परिस्थिती हाताळली. सुमारे दोन तास त्याला बोलण्यात गुंतवून ठेवले. पोलिसांनी बेसावध असल्याचा नेमका क्षण हेरून झडप घालत अगदी सिनेस्टाईल त्याच्या मुसख्या आवळल्या. शुक्रवारी दुपारी हुडकेश्वर हद्दीतील पिपळा फाटा परिसरात हा थरारक घटनाक्रम घडला. (man with gun demanded 50 lacs to builder in Nagpur)

पेशाने लॅन्ड डेव्हलपर आणि बिल्डर असणारे राजू वैद्य यांचे हुडकेश्वर मार्गावर पिपळा फाटा येथे प्रशास्त घर आहे. दर्शनी भागात सेवा असोसिएशन व क्रिएटिव्ह क्रेडिट को- ऑपरेटिव्ह सोसायटीचे कार्यालय आहे. दोन्ही संस्थांचे वैद्य हेच सर्वेसर्वा आहेत. कार्यालयामागेच दोन मजली घर आहे. शुक्रवारी दुपारी कामानिमित्त ते घराबाहेर होते. हिच संधी साधत आरोपी हातात माउझर घेऊन मुख्य गेटनेच आत शिरला. मोलकरणीला माउझरचा धाक दाखवत शांत राहण्यास सांगितले. तिने आरडाओरड करताच शेजारीही पोहोचले. उघड्या दारातून आरोपी मोलकरणीला घरात घेऊन गेला. वैद्य यांच्या पत्नी व वृद्ध आई आतच होत्या. त्यांना जीवे मारण्याची धमकी देत ५० लाखांच्या खंडणीची मागणी केली.

घटनेच्या वेळी वैद्य यांच्या वहिणी, दोन पुतण्या व मुलगा वरच्या माळ्यावर होते. त्यांना तिथेच राहण्यास सांगितले. घटनेची माहीत मिळताच हुडकेश्वर पोरिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. एकीकडे पोलिसांनी त्याच्यासोबत वाटाघाटी सुरू ठेवल्या. त्याचवेळी साध्या वेषातील काही पोलिस कर्मचारी वरून आत शिरले. सर्वप्रथम पहिल्या माळ्यावर असणाऱ्यांना सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर अगदी सिनेस्टाईल झडप घालून त्याला ताब्यात घेतले. गाडीत टाकून त्याला ठाण्यात नेण्यात आले.

आरोपीला दिले ६ लाख

अप्रीय घटना टाळून आरोपीला पकडण्याचे आव्हान पोलिसांपुढे होते. अचूक नियोजनासाठी पोलिसांना वेळही हवा होता. पोलिसांनी प्रसंगावधान राखत वेळेवरच प्लानिंग केले. ठरल्याप्रमाणे पोलिस निरीक्षक भोसले यांनी आरोपीसोबत चर्चा करीत त्याला बोलण्यात गुंतवूण ठेवले. अधिकाधिक वेळ मिळावा यासाठी आरोपीला प्रत्येकी २ लाख याप्रमाणे तिन टप्प्यात ६ लाख रुपये दिले. हा घटनाक्रम सुरू असतानाच पोलिसांच्या एका पथकाने आर्किटेक्चरकडून घराचा प्लान समजून घेतला. कुठून आत शिरता येईल याची चाचपणी केली. साध्या वेषातील पोलिस कर्मचाऱ्यांनी वरच्या भागातून आत शिरत प्रथम वरच्या माळ्यावरील तिघांची सुटका केली. त्यानंतर खाली येऊन आरोपीच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून माउझर, चाकू आणि ६ लाख रुपये जप्त करण्यात आले. मात्र आरोपीची ओळख अजूनही पटू शकली नाही.

सोसायटीत दरोडेखोर शिरल्याची चर्चा

क्रेडीट को-ऑपरेटिव्ह सोसायटीत तीन ते चार दरोडेखोर पिस्तूल व चाकू घेऊन आत शिरल्याची चर्चा परिसरात वाऱ्याच्या वेगाने पसरत गेली. पोलिसांचा ताफा आणि अधिकाऱ्यांच्या वाहनांचे येणे जाणे सुरू असल्याने अफलेला बळ मिळत होते. बघ्यांची मोठी गर्दी वैद्य यांच्या घरासमोर झाली होती.

(man with gun demanded 50 lacs to builder in Nagpur)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : पेशवे बाजीरावांच्या स्मारकासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे NDA - गृहमंत्री अमित शाह

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT