mangesh kadav
mangesh kadav 
नागपूर

खंडणीबाज मंगेश कडवर गुन्हयांवर गुन्हे ; कार घेतली होती हिसकावून

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : शिवसेनेचा निलंबित शहरप्रमुख मंगेश कडव याच्याविरुद्ध बजाजनगर पोलिस ठाण्यात पुन्हा एक गुन्हा दाखल झाला. हा त्याच्याविरुद्ध सातवा गुन्हा आहे. अशोक रमेश मांकेश्वर (56, रा. रामदासपेठ) यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. यापूर्वीचे त्याच्याविरुद्ध सक्करदरा, हुडकेश्वार, अंबाझरी, सीताबर्डी पोलिस ठाण्यात प्रत्येकी एक आणि बजाजनगर ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत.
 फसवणुकीच्या गुन्ह्यात मंगेशची पत्नी डॉ. रुचिका हिलाही गुन्हे शाखा अटक करणार असल्याची माहिती आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेतून हकालपट्‌टी झालेला शहरप्रमुख खंडणीबाज मंगेश कडववर फसवणूक, खंडणी मागणे, धमकावण्याचे पाच गुन्हे दाखल आहेत.

 आठवडाभरापासून तो फरार होता. पोलिस त्याचा शोध घेत होते. त्याच्या शोधात पोलिस भंडारा, गडचिरोली व मुंबई येथेही जाऊन आले. पण, सोमवारी त्याची पत्नी डॉ. रुचिता हिला खासगी रुग्णालयातून उपचार घेऊन बाहेर पडताच तिला अटक करण्यात आली. ती सध्या कारागृहात आहे. त्यानंतर लपून असलेल्या मंगेश कडवला 8 जुलैला रात्री गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक किरण चौगुले यांनी पांढराबोडी परिसरातून अटक केली. त्याला आठ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, अशोक मांकेश्वर यांची तक्रार गुन्हे शाखेला प्राप्त झाली. मांकेश्वर सनदी लेखापाल असून, 2014 मध्ये त्यांना पैशाची आवश्‍यकता होती. त्यावेळी त्यांनी कडवशी संपर्क केला. त्याने त्यांची बीएमडब्ल्यू तारण ठेवून 10 लाख रुपये उधार दिले होते. त्यांच्या पाठीमागे मंगेश कडवने त्या कारवर बॅंकेतून कर्ज घेतले. या कर्जाची परतफेडही मांकेश्वर यांना करायला लावली. त्यानंतर त्यांची दुसरी कारही हिसकावून घेतली होती. या प्रकरणी त्यांनी गुन्हे शाखेकडे तक्रार दिली. या प्रकरणी बजाजनगर पोलिस ठाण्यात मंगळवारी रात्री गुन्हा दाखल केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

'नाष्ट्याला राजकारणी खातो' म्हणणारे TN शेषन काँग्रेसकडून होते निवडणुकीच्या रिंगणात; भाजपच्या दिग्गज नेत्याला दिलं होतं आव्हान

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगे मोदींपेक्षा मोठे नेते, छगन भुजबळांचा टोला

SCROLL FOR NEXT