Many bogus employees in government Employees who have passed the exam in a bogus manner are on the governments radar 
नागपूर

शासनामध्ये अनेक बोगस कर्मचारी? बोगस पद्धतीने परीक्षा देऊन उत्तीर्ण झालेले कर्मचारी रडारवर

अनिल कांबळे

नागपूर : चार लाख रुपये तुमच्याजवळ असेल तर तुम्हाला हमखास शासकीय नोकरी मिळेल, अशी हमी देणाऱ्या टोळ्यांचा नुकताच पर्दाफाश झाला आहे. त्यामुळे अनेक विभागात बोगस पद्धतीने परीक्षा देऊन उत्तीर्ण झालेले कर्मचारी शासनाच्या रडारवर आल्याची चर्चा आहे. यानिमित्ताने नोकरी देणाऱ्या टोळ्यांमध्ये खळबळ उडाली. बोगस पद्धतीने नोकरीवर लागलेल्या कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावरील हास्य मात्र, गायब झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नुकताच पोलिस उपायुक्त नुरूल हसन यांनी एका हायटेक टोळीतील चार जणांना अटक केली आहे. या टोळीचे मास्टरमाईंड प्रेमसिंग राजपूत (औरंगाबाद) आणि पूनमसिंग सुंदरडे (औरंगाबाद) हे दोघे आहेत. मायक्रोफोन, ब्लूटूथ आणि टॅबच्या मदतीने ही टोळी शासकीय नोकरीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेत डमी उमेदवार बसविल्या जात असल्याचे त्यांनी कबुल केले आहे. तसेच त्यांनी परीक्षा केंद्रावर एक आणि नोकरी मिळविणारा भलताच उमेदवार असा प्रकार करीत असल्याचेही मान्य केले आहे.

टोळीतील पेपर सोडविणारा उमेदवार हा मायक्रो कॅमेऱ्याच्या माध्यमातून पेपरचे फोटो बाहेर पाठविल्या जातात. तर बाहेर बसलेला टोळीचा सदस्य फोनवरून त्या उमेदवाराला उत्तरे सांगतो. ब्यूटूथच्या माध्यमातून तो उमेदवार पेपर सोडवितो. अशी मोडस ऑपरेंडी ही टोळी वापरते ही पद्धत वापरली जात असल्याचीही कबुली त्यांनी दिली आहे. यावरु या प्रकरणाचा उलगडा झाला असून मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केल जात आहे. 

शासनाच्या कोणत्याही विभागाची परीक्षा असू द्या, आम्ही पास करून देऊ. असा विश्‍वास ही टोळी देते. नोकरी लागल्यानंतर अर्धे पैसे द्यावे लागत असल्यामुळे या टोळीच्या जाळ्यात अनेक उच्चशिक्षित किंवा पैसेवाले उमेदवार अडकतात. पेपर डमी उमेदवार सोडवितो आणि नोकरीसाठी आवश्‍यक तेवढे मार्कसुद्धा मिळवून देतो. अशा प्रकारे शासकीय नोकरी मिळविणाऱ्यांची संख्या मोठी आहे.

क्रीडा प्रमाणपत्र घोटाळा

यापूर्वी ‘सकाळ’ने केलेल्या पाठपुराव्यामुळे राज्यातील क्रीडा प्रमाणपत्र घोटाळा उघडकीस आला होता. शासनाच्या अनेक विभागात बोगस क्रीडा प्रमाणपत्र जोडून नोकऱ्या लाटल्याचे स्पष्ट झाले आहे. एका पोलिसालाही नुकताच अटक करण्यात आली आहे. यामध्ये अनेक खेळांच्या संघटना आणि क्रीडा अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा घोटाळा झाला होता. त्याचप्रमाणे या टोळीच्या माध्यमातूनही अनेकांनी नोकऱ्या बळकावल्याचे बोलले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई गोवा मार्गावर अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी, वाहनांच्या ८ ते ९ किमी रांगा; प्रवाशी संतप्त

Aditi Swami Success Story : अर्जुन पुरस्कार विजेत्या आदितीचा डंका! मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारीपदी वर्णी; ओजस देवतळे, प्रथमेश फुगे यांचीही नियुक्ती

Koyna Dam Bridge Update : छत्रपती शिवाजी महाराज जलाशयावरील बहुचर्चित आहिर-तापोळा केबल स्टे ब्रिज कधी खुला होणार? 95 टक्के काम पूर्ण, T & T कंपनीनं काय सांगितलं?

WOMEN'S ASIA CUP 2026: फायनलआधी टीम इंडियाची फिल्डिंग ठरतेय डोकेदुखी! ४ झेल सुटले, दीप्ती शर्माने सांगितलं ‘या’ सामन्यात चूक होणार नाही

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT