How to increase registration if marks are not received 
नागपूर

निकाल तर लागला, गुणपत्रिकेचं काय? कागदपत्र नसल्याने विद्यर्थ्यांच्या प्रवेश नोंदणीवर परिणाम

मंगेश गोमासे

नागपूर : राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या वतीने १० ऑगस्टपासून पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली. यावर्षी प्रक्रिया संपूर्णतः ऑनलाइन असल्याने विद्यार्थ्यांना घरातूनच अर्ज करायचे आहेत. मात्र, अद्याप दहावीची गुणपत्रिका विद्यार्थ्यांना मिळाली नसल्याने २५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी विद्यार्थी आणि पालकांनी केली.

राज्यात पॉलिटेक्निकच्या १ लाख ८४१ जागा आहेत. राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता, विभागाने पॉलिटेक्निक अभ्याक्रमाचे प्रवेश ऑनलाइन पध्दतीने करण्याचा निर्णय घेतला. यामुळे यावर्षी विद्यार्थ्यांना घरून लॅपटॉप आणि मोबाइलवर अर्ज भरता येणे शक्य होणार आहे.

यानुसार विद्यार्थ्यांना कागदपत्रे डाऊनलोड करावे लागणार आहे. यानंतर विभागाकडून विद्यार्थ्यांचे ई-स्क्रुटनीच्या माध्यमातून अर्ज आणि कागदपत्रांची ऑनलाईन तपासणी करण्यात येईल. ज्यांच्याकडे मोबाईल वा लॅपटॉप नाही त्यांच्यासाठी ऑफलाइन पद्धतीने विशिष्ट वेळेत बोलावून त्यांचा कागदपत्रांची तपासणी करण्यात येईल. यासाठी सुविधा केंद्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना क्रेडिट व डेबिट कार्डच्या माध्यमातून शुल्क भरता येईल. 

१० ऑगस्टपासून अर्ज नोंदणीस सुरुवात करण्यात आली. विद्यार्थ्यांना 25 ऑगस्ट पर्यन्त नोंदणी करता येणार आहे. १७ तारखेपासून दहावीच्या गुणपत्रिकेचे वाटप करण्यास सुरुवात करण्यात आली. मात्र, अद्याप विद्यार्थ्यांना गुणपत्रिका आणि शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र मिळालेले नाही. त्यामुळे बरेच विद्यार्थी नोंदणीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

गेल्यावर्षी राज्यात पॉलिटेक्निकच्या निम्म्या जागा रिक्त राहील्या होत्या. विभागात 50 महाविद्यालयात 13 हजार 126 जागांचा समावेश असून गेल्यावर्षी 6 हजार 494 जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याने निम्म्या जागा रिक्त राहिल्या होत्या.

प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक

१० ते २५ ऑगस्ट - अर्ज नोंदणी
१५ ते २५ ऑगस्ट कागदपत्रांची पडताळणी
२८ ऑगस्ट - तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर करणे
२९ ते ३१ ऑगस्ट - आक्षेप घेता येणे
२ सप्टेंबर - अंतिम गुणवत्ता यादी

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Wholesale Inflation India : घाऊक महागाईचा दर वाढला! 4 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली आकडेवारी, सामान्य जनतेला फटका

बॉक्स ऑफिसवर मराठी सिनेमांचा डंका ! तीन दिवसात तिन्ही सिनेमांनी केलेलं कलेक्शन घ्या जाणून

अ‍ॅडव्हान्स कर भरलात का? आज शेवटची तारीख, न भरल्यास होईल दंड

Sanjay Raut : भारत-पाक सामन्यामुळे पाकिस्तानला मिळाले हजार कोटी रुपये? संजय राऊत म्हणतात दीड लाख कोटींचा जुगार...

Gold Rate Today : आज अचानक उतरले सोन्याचे दर! किती हजारांनी स्वस्त झालं, पाहा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT