Mask 
नागपूर

कोरोनाला हरविण्यासाठी यांनीही कसली कंबर; मास्क निर्मितीसाठी सरसावल्या महिला

सकाळ वृत्तसेवा

 नागपूर : कोरोना महामारीपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी काळजी घेणे हाच एकमेव पर्याय आहे. साबणाने हात धुणे, सोशल डिस्टंन्सिंग पाळणे आणि कामासाठी बाहेर पडताना चेहर्यावर मास्क वापरणे हे उपाय अत्यावश्यक आहेत. यासाठी मास्क ही महत्त्वाची गरज झाली आहे. या मास्कची कमतरता भासू नये म्हणून माजी महापौर अर्चना डेहनकर यांच्या पुढाकाराने अनेक महिला सरसावल्या आहेत. काही बचत गटाच्या महिलांना घेऊन घरीच मास्क बनविण्याचे काम सुरू केले आहे.
 बाहेर जाताना मास्क वापरणे शासनाने अनिवार्य केले आहे. मात्र गरीब गरजू लोक एकतर ते खरेदी करू शकत नाही किंवा जागृतीचा अभावही बघायला मिळतो. शिवाय मास्कचाही तुटवडा जाणवत आहे. अशावेळी घरी राहून महिलांनी मास्कची निर्मिती करण्याचे आवाहन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्यानुसार मास्क बनविण्याचा टास्क महिला मोर्चाने स्वीकारला. मैत्रीणींनी मिळून हा उपक्रम सुरू केला. आपल्याकडे थोडे कापड होते. काही कापड व्यापार्यांशी संपर्क करून त्यांच्याकडूनही बोलावून घेतले. यानंतर कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत शिवणकामाचे प्रशिक्षण दिलेल्या महिला आणि काही बचत गटाच्या महिलांना गरीबांसाठी मास्क बनवून देण्याचे आवाहन केले. एका शब्दावर या महिला नि:शुल्क काम करण्यास तयार झाल्या. कापडाची कटाई आपण स्वत:च करीत असल्याचे त्यांनी सांगितले. ज्यांच्याकडे शिलाई मशीन आहेत त्यांच्यापर्यंत हे कापड पोहचविले. या महिलांनी घरकामातून वेळ काढून दररोज किमान ५० मास्क शिवून दिले.

सविस्तर वाचा - या चिमुकल्यांच्या कुटुंबाची कहाणी देईल तुम्हाला जगण्याचे बळ...एकदा वाचाच
 २५ महिला घरी राहून मास्क बनविण्याचे काम करीत आहेत. गेल्या पाच दिवसात त्यांनी १००० मास्क तयार करून आपल्यापर्यंत आणून दिल्याचे डेहनकर यांनी सांगितले. हे मास्क आम्ही झोपडपट्टी भागात गरीब गरजूंपर्यंत पोहचूवून देत असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही ५००० मास्क बनवून गरजूंपर्यंत पोहचवून देण्याचे लक्ष्य ठेवल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT