maratha reservation protest msrtc Operate only with permission instructions to drivers Sakal
नागपूर

Maratha Reservation : मराठा आंदोलनाची धग, एसटी विभाग सावध; परवानगी घेऊनच परिचालन करा, चालक-वाहकांना सूचना

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला मराठवाड्यात हिंसक वळण

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला मराठवाड्यात हिंसक वळण लागले आहे. एसटी महामंडळाच्या बस पेटविणे आणि दगडफेकीच्याही घटना घडल्या. त्यामुळे नागपूर विभागाने मराठवाड्याला जाणाऱ्या गाड्यांबाबत सावध भूमिका घेतली आहे. आंदोलनाच्या मार्गावर परवानगी घेतल्याशिवाय जाऊ नये, अशा सूचना चालक-वाहकांना देण्यात आल्या आहेत.

जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव आदी मराठवाड्यातील जिल्ह्यात मराठा आंदोलन तीव्र होत आहे. काही जिल्ह्यातील गावागावात आंदोलन सुरू आहे. आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक वळण लागले. आंदोलकांनी बीडमधील सोलापूर-धुळे महामार्गावर चक्क एसटी पेटवून दिली.

यापूर्वी यवतमाळच्या उमरखेड तालुक्यात नांदेडहून नागपूरच्या दिशेने निघालेली बस पेटविण्यात आली होती. तर छ.संभाजीनगर, धाराशिव, जालना या ठिकाणी तब्बल १२ बसवर दगडफेक झाली.

एसटीचे नुकसान आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी एसटी महामंडळच्या नागपूर विभागाने सावध भूमिका घेतली आहे. नागपूर विभागातून छ. संभाजीनगर, नांदेड, अंबेजोगाई, परभणी, लातूर, जालना, परळी, सोलापूरकरिता गाड्या धावतात. या मार्गावरील बसचालक व वाहकांना मार्गावर आंदोलनाची माहिती मिळाल्यास परवानगी न घेता पुढे जाऊ नये. अशी सूचना देण्यात आली आहे. याकरिता संबंधित जिल्ह्यातील आगार व्यवस्थापकांशी संपर्क साधला जाणार आहे.

आगार व्यवस्थापकांना सूचना

विभाग नियंत्रक प्रल्हाद घुले यांनी नागपूर विभागातील आठही आगार व्यवस्थापकांची बैठक घेतली. मराठवाड्यात एसटीच्या झालेल्या नुकसानीची दखल घेत याबाबत आगार व्यवस्थापकांना सूचना केल्या. मराठवाड्यात स्थिती पाहून स्थानिक अधिकाऱ्यांशी चर्चा करूनच गाडी पुढे सोडावी, असे आदेश दिले.

मराठवाड्यात आंदोलनामुळे एसटीचे नुकसान झाले आहे. मात्र, आम्हाला एसटी बंद ठेवता येत नाही. त्यामुळे या भागात जाणाऱ्या गाड्यांना ज्या ठिकाणी आंदोलन आहे. तेथील स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधून स्थिती लक्षात घेऊनच गाडी पुढे सोडण्याचे आदेश बैठकीत सर्व आगार व्यवस्थापकांना दिले आहेत. चालक-वाहकांनीही आगार प्रमुखांशी संपर्क साधून परवानगी घेऊनच गाडी नेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

- प्रल्हाद घुले, विभागीय नियंत्रक- एसटी महामंडळ, नागपूर विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Junnar Beef Seized: 'जुन्नरला चार गाई व दोन टन गोमांस जप्त'; जुन्नर पोलिसांची धडक कारवाई

Latest Marathi News Live Update: डाळी उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणी केल्यास नाफेड मार्फत भारत सरकार ते खरेदी करणार-अमित शाह

OBC Reservation : धनगर समाजाने सत्ता काबीज करुन ओबीसींचं आरक्षण वाढवावं; प्रकाश आंबेडकरांनी सांगितला नवा फॉर्म्युला

Mumbai Politics: तीन महिन्यांत ५ भेटी… ठाकरे बंधुंची युती पक्की की अजूनही चर्चा? पाहा सर्वात चर्चेत असलेली राजकीय भेटीची टाइमलाइन

Kojagiri Pournima 2025: कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजापूर मार्ग मंगळवारपर्यंत बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग

SCROLL FOR NEXT