Marriage to take place after Diwali due to Corona and Lockdown 
नागपूर

लॉकडाउनमुळे मंगल 'कार्या'ला लागले टाळे; आता दिवाळीनंतरच शुभमंगल सावधान...

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाउनचा फटका लग्नासह सर्व धार्मिक समारंभांना बसला आहे. आता जवळपास सर्वच लग्न समारंभ रद्द झाले तर काहींनी पुढे ढकलले आहेत. त्यामुळे नागपूरमध्ये मंगल कार्यालयांना तब्बल 120 कोटींचा फटका बसला आहे. आता सर्वांना दिवाळीनंतरच लग्नाचा बार उडवावा लागणार आहे. 
कोरोनामुळे उद्‌भवलेली परिस्थिती सावरण्यास किमान तीन ते चार महिने लागण्याची शक्‍यता आहे. लॉकडाउन टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यात येणार आहे. किमान संपूर्ण एप्रिलमध्ये जिल्हाबंदी कायम राहील, असे संकेत आहे. त्यामुळे काम करणाऱ्यांची कमतरता भासणार आहे. 

प्रतापनगर येथील नक्षत्र मंगल कार्यालयाचे संचालक प्रशांत चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता कोरोनामुळे मंगल कार्यालयांना चांगलाच फटका बसल्याचे सांगितले. एका मंगल कार्यालयात एका सिझनमध्ये साधारणत: 60 ते 65 लग्न होतात. नागपुरात 8 ते 10 लाखांपर्यंत लग्नाचे पॅकेज आहे. या पॅकेजमध्ये रोषणाई, कॅटरिंग, मंडप, भटजी, अक्षदा, वरात, बॅंडवाले, फोटो शूट व व्हिडिओ शूटिंग, वरपक्षाची सरबराई, अल्बम, लग्नानंतर वराकडच्यांना लाडू-चिवड्याची पाकिट देणे अशा सर्व गोष्टींचा समावेश आहे. वरपक्षाला फक्त घरून बॅगा भरून यावे लागते. 

परिस्थिती सावरण्याची चिन्हे कमी

एका मंगल कार्यालयात सरासरी 60 लग्न लागतात, असे समजले तरी 20 मंगल कार्यालयांत 1,200 लग्न लागतात. 10 लाखांचे पॅकेज पकडले तरी साधारणत: 1,200 कोटींचे नुकसान केवळ लग्न रद्द झाल्यामुळे वा पुढे ढकलण्यात आल्यामुळे झाले. पावसाळ्यात मंगलकार्ये होत नाहीत. त्यामुळे दिवाळीशिवाय पर्याय नाही. लग्नाव्यतिरिक्त वर्षभर मुंज, साक्षगंध, वाढदिवस, कॉर्पोरेट सेक्‍टरचे कार्यक्रम चालतात. लॉकडाउनमुळे 14 एप्रिलपर्यंत कोणताही कार्यक्रम घेता येत नाही. त्यानंतरही परिस्थिती सावरेल असे चित्र सध्या तरी नाही, असे चौधरी म्हणाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: डीआरआयची मोठी कारवाई! २८ कंटेनर अन् ८०० मेट्रिक टन पाकिस्तानी माल जप्त, मुंबईत खळबळ

Palghar News: विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला! जिल्हा परिषदेतील शिक्षकांची १८ टक्के पदे रिक्त

Latest Marathi News Updates: सोलापुरातील होडगी रोडवर एका दुचाकीच्या शोरूम ला लागली आग

Baramati News : कारखेल येथे वीजेच्या धक्याने तरुणाचा मृत्यू, गावात शोककळा

Nagpur News: तीन एकर जागेवर उभारणार अत्याधुनिक श्वान निवारा केंद्र; प्राण्यांसाठी असणार सर्व सोयी सुविधा उपलब्ध

SCROLL FOR NEXT