atyachar atyachar
नागपूर

फेसबुक फ्रेंडकडून विवाहिता गर्भवती; नागपूर, जळगावात केला बलात्कार

विवाहित महिलेवर फेसबुक फ्रेंड्सचा बलात्कार; प्रियकराने केला गर्भपात

अनिल कांबळे

नागपूर : विवाहित महिला फेसबुकवरून जळगावच्या युवकाच्या प्रेमात पडली. प्रेयसीसाठी त्याने नागपूर गाठले आणि तिचा पती नसताना बलात्कार केला. गर्भवती झाल्यानंतर तिचा बळजबरीने गर्भपात केला. लग्नाचे आमिष दाखविल्यानंतर लग्नास नकार दिला. त्यामुळे महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी फेसबुक फ्रेंडवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला. देवेंद्र विकास पवार (३८, रा. चांदसार, जि. जळगाव) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३६ वर्षीय महिला जरीपटक्यात राहते. महिलेचे १८ व्या वर्षी लग्न झाले असून तिचा पती खाजगी वाहनचालक आहे. तिला एक मुलगा व मुलगी आहे. पतीसोबत पटत नसल्याने ती मुलांना घेऊन वेगळी राहते. ती खाजगी दवाखान्यात परिचारिका म्हणून कार्यरत आहे. तिची सप्टेंबर २०१७ मध्ये जळगाव येथे राहणारा देवेंद्र पवार याच्याशी फेसबुकवरून फ्रेंडशिप झाली.

सुरुवातीला काही दिवस चॅटिंग केली. त्यानंतर देवेंद्रने तिला भेटण्यासाठी जळगावला बोलावले. त्यानंतर ती देवेंद्रला भेटण्यासाठी जळगावला गेली. देवेंद्रने तिला मित्राच्या घरी नेऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर त्याने तिला लग्नाचे आमिष दाखविले.

पतीपासून वेगळी रहात असल्याने पतीला घटस्फोट देऊन ती देवेंद्रसोबत लग्न करणार होती. त्यानंतर देवेंद्र नागपूरला आला. शताब्दी चौकात भाड्याने खोली घेऊन काही दिवस ते पती-पत्नीप्रमाणे राहत होते. २०१९ मध्ये महिला ही जरीपटका हद्दीत कुशीनगर येथे रहायला गेली. तेथेही त्याने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

बळजबरी केला गर्भपात

महिला देवेंद्रपासून गर्भवती झाली. तिने गर्भपात करण्यास नकार दिला. त्याने तिला लग्न करण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर त्याने तिचा बळजबरी गर्भपात करून घेतला. त्यानंतर देवेंद्रने लग्न करण्यास नकार दिला. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jejuri Palkhi Accident : तापाच्या गोळ्या घेतल्या, चक्कर आली अन्... जेजुरीतील वारकऱ्यांच्या अपघाताचे धक्कादायक कारण समोर

'तिला मी आता कोणत्याच सिनेमात घेणार नाही' प्रवीण तरडे पत्नी स्नेहलबद्दल असं का म्हणाले... Viral Video

Latest Marathi News Live Update : जेजुरीत वारकऱ्यांच्या अपघातांची मालिका सुरूच; दुचाकीच्या धडकेत दिंडी प्रमुख गंभीर जखमी

Almatti Dam Update : 24 तासांत बदलली परिस्थिती! कोल्हापूर-सांगलीकरांना मोठा दिलासा; 'आलमट्टी'तून पाणी सोडणं पूर्णपणे बंद, कृष्णेची पातळी स्थिर राहणार?

Mumbai Local Train: लोकलमधील AC १० मिनिटांपासून बंद, गुदमरून तीन प्रवाशी बेशुद्ध; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT