Mass abuse of a minor girl in Nagpur gramin 
नागपूर

नागपूर ग्रामीणमध्ये अल्पवयीन मुलीवर आळीपाळीने अत्याचार; पाच आरोपी अटकेत

सकाळ डिजिटल टीम

रामटेक (जि. नागपूर) : रामटेक पोलिस ठाण्यापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर एका तेरा वर्षीय मुलीवर गावातीलच पाच युवकांनी आळीपाळीने अत्याचार केल्याची घटना घडली. २९ डिसेंबरला सायंकाळी सात वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. दोन जानेवारीला पीडित मुलीने रामटेक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

फिर्यादीने सांगितल्याप्रमाणे, अतुल विश्‍वनाथ हटवार (रा. अंधळगाव, ता. मोहाळी, जि. भंडारा) याने जबरदस्तीने दुचाकीवर बसवून खिंडसी तलाव परिसरातील डोंगराजवळील घनदाट झाडीत घेऊन गेला. तिथे पोहोचल्यानंतर त्याचे मित्र धीरज मेहरकुळे, सौरभ मेहरकुळे, होमदास मेहरकुळे, हर्षल मेहरकुळे (सर्व रा. दुधाला, कवडक) यांना फोनवरून बोलावून घेतले. तिथे जबरदस्तीने आळीपाळीने शारीरिक सबंध प्रस्थापित केले.

घटना घडल्यानंतर अल्पवयीन मुलीने रडत रडत आई-वडिलांना हकीकत सांगितली. आई-वडिलांनी पोलिस ठाणे गाठून पोलिसांत तक्रार केली. माहिती मिळताच नागपूर ग्रामीण पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली नयन आलूरकर, पोलिस निरीक्षक प्रमोद मकेशवर, कर्मचारी वर्ग यांनी शिताफीने गुन्ह्यातील पाचही आरोपीला तात्काळ अटक केली.

आरोपीवर अत्याचाराचा गुन्हा व अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन जानेवारीच्या सकाळपर्यंत पोलिस तपास करीत होते. या दरम्यान दोन जानेवारीला ग्रामीणचे पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनीही भेट दिल्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद मकेशवर यांनी सांगितले. या गुन्ह्याच्या तपास रामटेक पोलिस उपविभागीय अधिकरी नयन आलूरकर करीत आहेत.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs RCB WPL 2026 : जॅकलिनचा डान्स, हनी सिंगचा धमाका; हवा केली ‘त्या’ तरुणीने! कोण आहे Harnaaz Kaur Sandhu?

Municipal Election: भिवंडीचे राजकारण अडकलं बिगर-मराठी मतदारांच्या कौलात; शेवटच्या क्षणीही सस्पेन्स कायम!

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये ठाकरे बंधुंची संयुक्त सभा सुरू

Stray Dogs Issue: शिक्षकांना भटके कुत्रे पकडण्याचे आदेश; शिक्षण विभागाचे अजब फर्मान, सरकारच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह

Municipal Election 2026 : अमरावतीत प्रचाराला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न? अनिल बोंडेंच्या 'त्या' दाव्यानं राजकारण तापलं, संजय खोडकेंचंही प्रत्युत्तर...

SCROLL FOR NEXT