Murder by slitting the throats of two children and wife in Nagpur
Murder by slitting the throats of two children and wife in Nagpur Murder by slitting the throats of two children and wife in Nagpur
नागपूर

धक्कादायक! पत्नी, दोन मुलांचा गळा चिरून खून; पतीने केली आत्महत्या

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : कर्जबाजारी झालेल्या युवकाने पत्नी व दोन मुलांचा चाकूने गळा चिरून खून (Murder) केला. त्यानंतर स्वतः आत्महत्या (Suicide) केली. ही खळबळजनक घटना मंगळवारी दुपारी चार वाजता जरीपटक्यातील दयानंद पार्क परिसरात उघडकीस आली. पत्नी किरण अग्रवाल (३३), मुलगा वृषभ (१०) आणि मुलगी टिया (५) अशी मृतांची नावे आहेत. तिघांना संपवल्यानंतर मदन अग्रवाल (४०, रा. दयानंद पार्क, जरीपटका) याने गळफास घेऊन आत्महत्या केली. (Murder by slitting the throats of two children and wife in Nagpur)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मदन अग्रवाल हा शांतीनगरात राहत होता. त्याचे दयानंद पार्क परिसरात मदन चायनिज नावाने दुकान होते. त्याने सर्वांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केल्यानंतर कुटुंबीयांचा संपर्क तुटला होता. त्याला क्रिकेट सट्टा खेळण्याचे व्यसन होते. जुगारात पैसे हरल्याने तीन दिवसांपासून तो तणावात होता. कर्ज फेडणे अवघड असल्याचे लक्षात आल्याने त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. मात्र, आपल्यानंतर पत्नी व मुलांची फरफट होईल या चिंतेतून त्याने सर्वांनाच ठार मारण्याचा ठरवले.

त्याने सोमवारी मोठा चाकू विकत आणला. मध्यरात्रीच्या सुमारास पत्नी आणि दोन्ही मुले झोपेत असताना पत्नी किरणच्या गळ्यावर चाकूने वार (Murder) केला. त्यानंतर मुलगा वृषभ आणि मुलगी टिया या दोघांनाही चाकूने भोसकले. तिघांचाही मृत्यू झाल्याची खात्री झाल्यानंतर मदनने छताच्या पंख्याला दोरी बांधून गळफास (Suicide) घेतला. याप्रकरणी जरीपटका पोलिसांनी मदन अग्रवालवर पत्नी व मुलांच्या खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

मित्र आल्याने सर्वांना कळले

मदनचा मित्र त्याला भेटायला घरी आला. दार ठोठावल्यानंतर कोणीही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्याला काहीतरी गडबड असल्याची शंका आहे. त्याने शेजाऱ्यांना आणि पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दार तोडले असता दोन्ही मुले आणि किरण एका बेडवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले तर मदन गळफास लावलेल्या अवस्थेत दिसला.

जुगार भोवला

मदन याला जुगार खेळण्याचाही हौस होती. तो क्रिकेटवर बेटिंग करायचा. यात हारल्याने त्याच्या डोक्यावर सुमारे २५ ते ३० लाखांचे कर्ज होते. ते फेडले नाही तर आपले व कुटुंबीयांचे कसे होईल याची भीती त्याला सतावत होती. यातून त्याने टोकाचे पाऊल उचलले असावे असा कयास वर्तविला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: माजी मंत्र्याच्या क्रूर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लोकांमध्ये संताप

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक आणि कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे; असं का म्हणाले मुश्रीफ?

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

Hardik Pandya MI vs KKR : पांड्यानं केली मोठी चूक; त्याच्यामुळेच मुंबईची ही अवस्था... इरफाननं कॅप्टन हार्दिकवर साधला निशाणा

RBI: मोदी सरकार बायबॅक करणार 40 हजार कोटींचे सोवेरियन बाँड, आरबीआयची माहिती; गुंतवणूकदारांचे काय होणार?

SCROLL FOR NEXT