massage 
नागपूर

युवकाने ऑनलाईन बुक केली मसाज गर्ल... चांगलेच पडले महागात

सकाळवृत्तसेवा

नागपूर : एका युवकाला "परी नाईट डॉट कॉम' या एस्कॉर्ट सर्व्हिसकडून मसाजसाठी युवतीला बोलावण्याची हौस चांगलीत महागात पडली. गुगल पेवरून युवतीला पैसे पाठलले. मात्र, वाट पाहता-पाहता सायंकाळ झाली परंतु, युवती आलीच नाही. युवतीने फसवणूक केल्याचे लक्षात येताच युवकाने थेट गिट्टीखदान पोलिस स्टेशन गाठून थेट तक्रार दाखल केली.

आर. धनकट हा उच्चशिक्षित युवक आहे. तो थकवा जाणवत असल्यामुळे त्याने 9 फेब्रुवारीला घरी होता. दरम्यान, त्याने "मसाज' करण्यासाठी युवतीला घरी बोलविण्याचा प्लान केला. त्याने मोबाईवरून "परी नाईट डॉट कॉम-एस्कॉर्ट सर्व्हिस'वरून एका युवतीचा फोटो निवडला. बेवसाईटवर दिलेल्या मोबाईल क्रमांकावर तिला फोन केला. तिने तासाभरात येत असल्याचे सांगितले. बुकिंग चार्ज म्हणून युवतीने 3 हजार रुपये अॅडव्हान्स मागितले. धनकटनेही पैसे देण्याची तयारी दर्शविली. तिने लगेच गुगल पे' रजिस्टर्ड असलेला नंबर पाठविला. त्याने त्या मोबाईलवर 3 हजार रुपये पाठवले. त्यानंतर तो त्या युवतीची वाट पाहत बसला होता.

बुकिंग केल्यावर युवती आलीच नाही 
दुपारचे चार वाजले तरी युवती अजून आली नसल्याने त्याने पुन्हा कॉल केला. "तू घरी आल्यावर माझ्याशी अश्‍लिल चाळे करशील, ही भीती आहे. त्यामुळे तू "रिस्क अमाऊंट' म्हणून आणखी दोन हजार रुपये गुगले पे कर.' अशी मागणी केली. त्यामुळे चिडलेल्या युवकाने तिला घरी आल्यावर देण्याची कबुली दिली तसेच अश्‍लिल चाळे न करण्याची हमी दिली. मात्र युवतीने पैसे न दिल्यास येणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे चिडलेल्या युवकाने तिला शिविगाळ केली आणि पैसे परत मागितले. युवतीनेही त्याला शिविगाळ करीत पैसे परत करण्यास नकार दिला. युवतीने फसवणूक केल्याचे लक्षात आल्यामुळे त्याने गिट्टीखदान पोलिस गाठले. त्याने पोलिसांना घडलेली हकीकत सांगितली. पोलिसांनी तक्रारीची शहानिशा करून आरोपी मोबाईल क्रमांकधारक युवतीवर गुन्हा दाखल केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Manhole Accident : मुंबईत २० ते २५ फूट खोल उघड्या मॅनहोलमध्ये माणूस पडला; बचावकार्य सुरू... BMC चा निष्काळजीपणा चव्हाट्यावर

Chhatrapati Sambhajinagar News : वर्षानुवर्षे ठाण मांडलेल्या मराठवाड्यातील 22 अधिकाऱ्यांची एकाच दिवशी उचलबांगडी; मक्तेदारी अखेर मोडीत

Khadakwasala Dam Water : पाण्याने गाठला १० वर्षातील तळ! पवना, वरसगाव, पानशेत धरणांचा दिलासा पण खडकवासल्याचं काय?

Latest Marathi News Live Update : मालेगाव महापालिकेवर 'लँड जिहाद विरोध' जनआक्रोश मोर्चा

उकळलेला चहा प्यायल्यानंतर १२वीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू, वडिलांचे शाळा व्यवस्थापनावर आरोप; तज्ज्ञांनी सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT