टाकळघाट ः हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणीवर उपचार सुरू असताना रुग्णालयासमोर जमलेली बघ्यांची गर्दी.  
नागपूर

माथेफिरू प्रियकराकडून प्रेयसीवर कैचीने सपासप वार

सकाळ वृत्तसेवा

टाकळघाट (जि.नागपूर) : प्रियकराने प्रेयसीवर भरदिवसा कैचीने सपासप वार करून तिला गंभीररीत्या जखमी केल्याची घटना मंगळवारी (ता.17) सकाळी दहाच्या सुमारास टाकळघाट येथे घडली. एमआईडीसी पोलिसांनी आरोपी प्रियकरास अटक केली. शुभम राजेंद्र काकडे (वय 23, गोंडवाना) असे आरोपीचे नाव आहे.


दोघांचेही एकाच वस्तीत राहणे
प्रेयसी गोंडवाना येथील रहिवासी असून, टाकळघाटमधील एका मेडीकल स्टोअर्समध्ये काम करते. प्रियकराचे घर गोंडवाना परिसरातच आहे. त्यांचे कित्येक दिवसांपासून सूत जुळले असावे, अशी चर्चा परिसरात सुरू होती. नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी 10 वाजता मेडिकल स्टोअर्स उघडण्याकरिता तरुणी आली. काही क्षणात आरोपी शुभम राजेंद्र काकडे मेडिकल स्टोअर्समध्ये पोहचला. दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. त्याने मेडिकल स्टोअर्सच्या आत जाऊन कैची उचलून तिला खाली पाडले व तिच्यावर कैचीने सपासप वार केले.

आरोपीला अटक
तरुणीचा ओरडण्याचा आवाज ऐकताच शेजारच्या दुकानमालकांनी त्याला पकडून स्टोअर्सच्या बाहेर काढले. तरुणीला जवळच असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रथमोपचार करून पुढील उपचाराकरिता नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात "रेफर' केले. सध्या तरुणीची प्रकृती स्थिर असून, बुटीबोरीच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच बुटीबोरीचे ठाणेदार आसिफ राजा शेख यांच्या मार्गदर्शनात पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहचला व आरोपीस अटक केली. गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू आहे.

कठोर शिक्षेची मागणी
आरोपी शुभम एमआयडीसी परिसरातील बारमध्ये "वेटर' म्हणून काम करतो. या दोघांमध्ये प्रेमप्रकरण असल्याची चर्चा आहे. तरुणीचे दोन दिवसांपूर्वी साक्षगंध झाले होते. त्यातूनच हा प्रकार घडला असल्याचे बोलले जाते. पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेऊन कठोर शिक्षा द्यावी, अशी नागरिकांनी मागणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पतीपासून दूर रहायचं नाहीतर.. धमकीनंतर १९ वर्षीय तरुणीला २५ वर्षीय महिलेनं संपवलं, मुंबईत खळबळ

Latest Marathi News Live Update : शरद पवार यांच्या प्रकृतीत सुधारणा; डॉक्टरांनी दिला पाच दिवस रुग्णालयात उपचार घेण्याचा सल्ला

Chandrapur Mayor : ठाकरेंची ऐनवेळी भाजपला साथ, काँग्रेसचा १ मतानं पराभव; पक्षाचा आदेश डावलणाऱ्यांवर वंचितकडून कारवाई

Patan Politics: पाटणच्या रणधुमाळीत ‘टांगा पलटी, घाेडे फरार’; पालकमंत्र्यांच्या विजयी रॅलीत मंत्री गोरे, गणेश नाईकांना कार्यकर्त्यांनी डिवचले!

Salman Khan Threat : रणवीर सिंग नंतर आता सलमान खानच्या निकटवर्तीय अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी, कोट्यवधींची मागितली खंडणी

SCROLL FOR NEXT