Mathematical models save delivery companies time vnit research nagpur sakal
नागपूर

Nagpur News : गणितीय मॉडेलमुळे वाचणार डिलिव्‍हरी कंपन्यांचा वेळ

व्हीएनआयटीच्या प्राध्यापकाचे संशोधन

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : सध्या ऑनलाइन खरेदीला मोठ्या प्रमाणात पंसती देण्यात येत आहे. काहीही हवे असल्यास ॲमेझान, फ्लिपकार्ट, स्विगी आणि झोमॅटोसारख्या कंपनीला ऑर्डर केल्यावर काही मिनिटात आणि विशिष्ट वेळेत उत्पादने आपल्या दारात येतात.

मात्र, या उत्पादनांची वाहतूक आणि त्यातील वेळ कमी करीत ग्राहकापर्यंत लवकरात लवकर पोहचविण्यासाठी व्हीएनआयटीच्या गणित विभागाच्या प्राध्यापकाने एक ‘मॅथेमॅटिकल मेथड’वर आधारित मॉडेल विकसित केले आहे.

ऑनलाइन कंपनीतून ऑर्डर मागविताना अनेकदा, ते उशिरा वा दिलेल्या वेळेत पोहोचत नसल्याची तक्रार असते. या प्रकाराने कंपनीचा वेळ जातो आणि त्यांना वाहतुकीच्या खर्चातही वाढ होते. त्यामुळे या दोन्ही बाबींवर डिलिव्हरी करणाऱ्या कंपन्या यामध्ये असलेल्या समस्येच्या शोधात असतात. अनेकदा नेमकी चूक कुठे आहे, हे लक्षात येत नाही. त्यामुळे अनेकदा नुकसान होताना दिसून येते. ही समस्या लक्षात घेऊन

विश्‍वेश्‍वरैय्या राष्ट्रीय अभियांत्रिकी संस्थेच्या गणित विभागाचे प्राध्यापक डॉ. विष्णूप्रताप सिंग यांनी एक गणित विषयातील ‘व्रांच ॲण्ड बाऊंड अल्गोरिदम मेथड’चा वापर करीत, यातील डेटा जमा करीत, त्यातून वाहतूक आणि वेळ वाचविण्यासाठी प्रयत्न केला. विशेष म्हणजे, त्यातून कंपन्यांना वेळ आणि वाहतुकीवर होणारा खर्च वाचल्याचेही दिसून आले. यासाठी त्यांनी काही गणितीय समिकरणांचीही मांडणी केली. त्या आधारे समस्या आणि त्यावरील समाधान शोधण्यास त्यांना मदत झाली.

अनेक प्रक्रियांमध्ये निर्माण होत असलेल्या समस्यांचे समाधान शोधण्यासाठी विविध गणितीय पद्धती आहेत. यासाठीही पद्धती असली तरी त्यात नविनीकरण करीत, त्यातून हे मॉडेल विकसित केले आहे. ही पद्धती खऱ्या अर्थाने उत्पादनाच्या डिलिव्हरीमधील वाहतूक आणि वेळेची समस्या मिटविण्यात यशस्वी ठरू शकते.

— डॉ. विष्णुप्रताप सिंग, प्राध्यापक, गणित विभाग, व्हीएनआयटी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे १३ दिवसांपासून निर्यात बंद; जेएनपीए बंदरात कंटेनर अडकले, शिपिंग कंपन्यांवर खंडणीचा आरोप, प्रकरण काय?

श्रीदेवी यांचा जाच करायची सासू, प्रेग्नेंट असताना पोटावर मारलेला बुक्का, घर फोडणारी बाई म्हणून मारायची टोमणे

Jannat Zubair: धक्कादायक! पनवेलमध्ये जन्नत जुबैर आणि तिचा भाऊ अयान जुबैरवर हल्ला; नेमकं काय घडलं?

Latest Marathi Update : चिपळूणमध्ये पर्यावरणासंबंधी तक्रारीसाठी नागरिकांची प्रदूषण कार्यालयात धडक

एसटी बँकेच्या वादाची परंपरा कायम, गोडसेचा अखंड भारताचे विधाते म्हणून उल्लेख; अनेकांचा आक्षेप

SCROLL FOR NEXT