The mayor made arrangements to release the workers in Madhya Pradesh 
नागपूर

Video : विदारक चित्र बघून महापौरांना बसला धक्का, ... तरीही केली सोय

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : शहराच्या सीमेवर असलेल्या जामठा टोल नाक्‍याजवळून दररोज हजारो कामगार ट्रकने अक्षरशः जनावरासारखे कोंबून मध्य प्रदेशात जात असल्याची धक्कादायक बाब महापौर संदीप जोशी यांच्या निदर्शनास आली. यानंतर त्यांनी महापालिकेच्या अखत्यारीत नसले तरी सर्व कामगारांना मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेल्या देवरी आणि खवासा येथे सोडण्यासाठी प्रत्येकी 25 बसेस सोडण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाला दिले. 

जामठा पांजरा टोल नाका शहरापासून अवघ्या 12 किलोमीटर अंतरावर आहे. येथून मध्य प्रदेशात हजारो कामगार ट्रकने जात असल्याची माहिती संदीप जोशी यांच्या कानावर आली. खातरजमा करण्यासाठी ते दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास पांजरा टोल नाक्‍यावर गेले. येथील विदारक चित्र बघून त्यांना धक्काच बसला. शेकडो कामगार रस्त्यावर उपाशीतापाशी बसले होते. त्यात गरोदर माता, लहान मुले, म्हातारे यांचा समावेश होता.

अनेक किलोमीटर चालून आल्याने अनेकांचे पाय सोलून निघाले होते. त्यांच्याकडे खायला आणि प्यायलाही काही नव्हते. जत्थ्याने कामगार जमले होते. कुठेही सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नव्हते. न्यायला आलेल्या ट्रकमध्ये त्यांना कोंबले जात होते. अशा परिस्थितीत कोरोनाचा प्रसार झपाट्याने होण्याचा धोका लक्षात घेता महापौर जोशी यांनी तातडीने टॅंकरने पाणी, भोजनाची व्यवस्था केली. 

परिसर महापालिकेच्या अखत्यारीत नाही

हा परिसर महापालिकेच्या अखत्यारीत येत नसला, तरी मानवतेच्या दृष्टिकोनातून तसेच कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेता खवासा येथे जाण्यासाठी 25 आणि देवरी बॉर्डरवर कामगारांना सोडण्यासाठी 25 बसेसची व्यवस्था करण्याचे निर्देश महापालिका प्रशासनास दिले. विशेष म्हणजे, येथे सुमारे दोन हजार कामगार होते. मंगळवारी येथून तब्बल 11 हजार कामगार गेल्याची माहिती महापौरांना मिळाली.

रोज किमान चार फेऱ्या

पांजरा येथील टोल नाक्‍यावरून 142 किमी दूर असलेल्या देवरी बॉर्डरपर्यंत रोज किमान 4 फेऱ्या (किमान 25 बसेस) तसेच खवासा बॉर्डर 92 किमीपर्यंत 4 फेऱ्या (25 बसेस)ची व्यवस्था मनपाने तत्काळ (17 तारखेपर्यंत) उभी करावी, तसे आदेश संबंधित अधिकाऱ्यास निर्गमित करावे, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी दिले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election 2026 : 'गोकुळ निवडणूक बिनविरोधसाठी प्रस्ताव नाही, आम्ही सर्व जागा लढवणार'; सतेज पाटलांची मोठी घोषणा, 'महायुती'वरही साधला निशाणा

Kagal Woman Dead Body : कागलमध्ये हाय व्होल्टेज टॉवरला महिलेचा मृतदेह; अनोळखी महिलेने ओढणीने गळफास घेतल्याचा प्राथमिक अंदाज

'धाकट्या सुनबाई' मध्ये दिसणार लोकप्रिय इन्फ्लुएन्सर; कोण आहे ती? 'अशी' आहे झी मराठीच्या नव्या मालिकेची कथा

Latest Marathi News Live Update : अनंत चतुर्दशीच्या दिवशी ॲक्वा मेट्रो लाईन ३ रात्रभर सुरू ठेवण्यात येणार

Pune MLC Election 2026 : महाविकास आघाडीचे ठरले! पदवीधरची जागा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला, तर शिक्षक मतदारसंघ पुन्हा काँग्रेसकडेच..; कोणाला मिळणार संधी?

SCROLL FOR NEXT