CRIME 
नागपूर

उपराजधानीत हे चाललंय काय? खुर्चीला हात पाय बांधून चिरला वृद्धाचा गळा; जेष्ठांच्या सुरक्षिततेवर प्रश्‍नचिन्ह 

अनिल कांबळे

नागपूर ः एका ६५ वर्षीय वृद्धाचे दोन्हा हात खुर्चीला बांधून निर्घुणपणे गळा चिरून खून करण्यात आला. ही थरारक घटना मंगळवारी सकाळी गणेशपेठ बसस्थानकासमोरील रजत संकुलच्या पहिल्या माळ्यावरील १०३ क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये उघडकीस आली. या घटनेने पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे. लक्ष्मण मलिक (वय ६५, रा.जरीपटका) असे खून झालेल्या वृद्धाचे नाव आहे. मलिक हे शासकीय निवृत्त कर्मचारी होते. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण मलिक यांचा कुटुंबातील सदस्यांसोबत वाद सुरू आहे. त्यामुळे ते त्यांचे मित्र धर्मरक्षित सरोदे यांच्या रजत संकुलमधील हर्बल हेल्थ केअरच्या कार्यालयातच राहायचे. सोमवारी रात्री नेहमीप्रमाणे कार्यालयातील कर्मचारी घरी गेले. लक्ष्मण एकटेच होते. मारेकरी फ्लॅटमध्ये घुसले. 

खुर्चीला त्यांचे हात बांधून धारदार शस्त्राने त्यांचा गळा चिरला. लक्ष्मण यांचा मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास कर्मचारी तेथे आला.त्याला लक्ष्मण हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्याने पोलिसांना माहिती दिली. 

माहिती मिळताच अतिरिक्त पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलिस उपायुक्त लोहित मतानी, गणेशपेठ पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भारत क्षीरसागर यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह हॉस्पिटलकडे रवाना केला. गणेशपेठ पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून मारेकऱ्यांचा शोध सुरू केला आहे. 

सीसीटीव्ही फुटेज ताब्यात 

रजत संकुलकडे येणाऱ्या सर्व रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. फुटेजच्या मदतीने पोलिस संशयितांचा शोध घेत आहेत. पोलिसांनी काही युवकांना संशयित म्हणून चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तसेच काही घरगुती वादाचीही किनार असल्यामुळे त्या दिशेनेसुद्धा पोलिस तपास करीत आहेत. 

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Moshi Building Collapse : मोशी दुर्घटनेतील शोधमोहीम ८३ तासांनी संपली; अखेरच्या बेपत्ता कामगाराचाही मृतदेह सापडला, मृतांचा आकडा ९ वर

आजचे पंचांग 12 जुलै 2026! प्रदोष, शिवरात्री, राहुकाळ आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या

Sangli Politics : जयंत पाटलांना बालेकिल्ल्यातच मोठा धक्का! ईश्वरपूरच्या नगराध्यक्षांचे पद रद्द, जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय; आता 15 दिवसांत काय होणार?

IND vs ENG 5th T20I: भारतीय संघाचा सुपडा साफ! इंग्लंडने मालिका ४-० ने खिशात घातली; श्रेयस अय्यरच्या संघाचे वस्त्रहरण...

Cheese Omelette Paratha: ब्रेड-ऑम्लेटला द्या ब्रेक! रविवारी बनवा हा भन्नाट चिज ऑम्लेट पराठा

SCROLL FOR NEXT