Minor decline in chicken sales bird flu and chicken marathi news 
नागपूर

खवय्यांमध्ये बर्ड फ्लूची भीती : चिकनच्या विक्रीत किरकोळ घट; विक्रेत्यांमध्ये चिंता

योगेश बरवड

नागपूर : बर्ड फ्लूसंदर्भात देशभरातून वृत्त येऊ लागल्याने उपराजधानीतील खवय्येसुद्धा धास्तावले आहेत. तूर्त चिकन विक्रीत घट झाली असली तरी ती अगदीच किरकोळ आहे. मात्र, पशुवैद्यकांनी शिजवलेल्या चिकनमधून बर्ड फ्ल्यूचा प्रादुर्भाव होत नसल्याने सांगून खवय्यांना चिंता न करण्याचा सल्ला दिला आहे.

लॉकडाउननंतर आता व्यवसाय सावरत असताना पुन्हा बर्ड फ्लूच्या वृत्ताने धडकी भरवली आहे. अद्याप नागपूर किंवा लगतच्या भागात बर्ड फ्लूच्या संसर्गाची नोंद झाली नसली तरी खवय्ये सावधगिरी बाळगत आहेत. गेल्या काही दिवसांपासून चिकन विक्रीत घट झाली आहे. पण, व्यावसायिक हित लक्षात घेऊन विक्रीतील घट मार्गशिष महिन्यामुळे असल्याचा युक्तिवाद विक्रेते करतात.

येणाऱ्या दिवसांमध्ये परिस्थिती निश्चितच सुधारेल असा विश्वास व्यक्त करीत आहे. त्याच वेळी दबक्या आवाजात फ्लूमुळे भविष्यात उद्भवणाऱ्या संभाव्य परिस्थितीबाबत चिंताही व्यक्त केली. ग्राहक घटण्याच्या भीतीने अनेक विक्रेत्यांनी चिकनचे दर प्रतिकिलो २० ते ३० रुपयांनी कमी केले आहेत.

सध्या कॉक्रेलचे प्रतिकिलो दर १६० ते १८० रुपये, बॉयलर व लेगहॉर्न १०० ते १२० रुपये आहेत. २०० रुपये किलो दराने विकल्या जाणाऱ्या हैदराबादी चिकनचे प्रतिकिलो दर १८० रुपयांपर्यंत खाली आले आहेत.

मटणाचे दर पुन्हा वधारले

बर्ड फ्लू ही संधी मानून मटण विक्रेत्यांनी पुन्हा दर वाढविण्यास सुरुवात केली आहे. लॉकडाऊनच्या काळात मटणाचे प्रतिकिलो दर ७५० रुपयांच्याही पुढे गेले होते. आता पुन्हा मटणाचे दर वाढविले जाऊ लागले आहेत. अनेक विक्रेते ६८० रुपयांपेक्षाही अधिक दराने मटणाची विक्री करीत असल्याचे दिसते. वेगवेगळ्या भागात दरही वेगवेगळे आहेत.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दोन कोटींची लाच मागणाऱ्या PSIच्या घरात ५६ लाखांची रोकड, सोन्याचे दागिने अन् मालमत्तेची कागदपत्रे; झडतीत काय सापडलं?

MP Udayanraje Bhosale: लोकांवर अन्याय झाल्यावर आवाज उठवतोच: खासदार उदयनराजे: साताऱ्यातील मनोमिलनाेबाबत केलं माेठे विधान..

Ladki Bhin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी ! आजपासून खात्यात जमा होणार 'इतके' पैसे

Morning Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा न तळता आख्या हिरव्या मुगाचे वडे, लगेच लिहून घ्या रेसिपी

Sushma Andhare: फलटण महिला डॉक्‍टर आत्‍महत्‍याप्रकरणी चौकशीसाठी उच्‍चस्‍तरीय समिती नेमा: सुषमा अंधारे आक्रमक; पोलिस ठाण्‍यासमोर ठिय्‍या..

SCROLL FOR NEXT