The minor hit the national runners bike sport player news 
नागपूर

दुःखद बातमी! धावपटू मयुरी पटलेचा अपघात; आयसीयुमध्ये जीवनमृत्यूशी झुंज

नरेंद्र चोरे

नागपूर : मित्रांसोबत शर्यत लावणाऱ्या दोन अल्पवयीन तरुणांनी तुफान दुचाकी चालवित मयुरी पटले नावाच्या महिला धावपटूला जोरदार धडक देऊन गंभीर जखमी केले. मयुरीच्या डोक्याला व डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. सध्या आयसीयुमध्ये जीवनमृत्यूशी ती झुंज देत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय मैदानी स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारी व जगदीशनगर (हजारीपहाड) येथे राहणारी मयुरी मंगळवारी सकाळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मैदानावर सुरू असलेल्या ‘खेलो इंडिया’च्या निवड चाचणीसाठी स्कुटीने जात होती. चाचणीसाठी चुलत भाऊ व बहिणीसोबत जायचे असल्याने ती दाभाकडे येत होती.

त्याचवेळी विरुद्ध दिशेने दोन वेगवेगळ्या गाड्यांवर येणाऱ्या १६ ते १७ वयोगटातील तीन-चार मित्रांनी रॉँग साईडने वेगाने गाडी चालवून तिला जोरदार धडक दिली. या अल्पवयीन मित्रांनी कोण पुढे जातो, अशी शर्यत लावली होती. यामध्ये वाहन चालविणाऱ्या युवकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि वाहन मयुरीच्या स्कुटीवर जाऊन धडकले.

गणेशनगर येथे नऊच्या सुमारास घडलेल्या या भीषण अपघातात मयुरीच्या डोक्याच्या मागच्या बाजूला मेंदूला जबर दुखापत झाली आहे. मेंदूत रक्तस्राव झाला. शिवाय तिच्या डोळ्याच्या आजूबाजूलाही जखम झाली. अपघातात मयुरीची गाडीही चेंदामेंदा झाली. वाहनचालक मुलगाही जखमी झाला. बेशुद्धावस्थेत जमिनीवर पडलेल्या मयुरीला ओळखीच्या खेळाडू मित्राने वाडी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.

मयुरी सध्या आयसीयूत भरती असून, जीवनमृत्यूशी झुंज देत आहे. १८ वर्षीय मयुरीने आतापर्यंत जिल्हा, विभागीय व राज्य स्पर्धांमध्ये अनेक पदके जिंकली आहे. राष्ट्रीय स्पर्धेतही तिने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे.

आर्थिक मदतीचे आवाहन

मयुरीचे वडील ड्रायव्हर असून, आई धुणीभांड्याची कामे करते. उपचाराचा खर्च करण्याची त्यांची ऐपत नाही. आतापर्यंत तिच्या उपचारावर ४० हजारांचा खर्च आला असून, आणखी गरज आहे. दानशूर व्यक्तींनी पीयूष आंबुलकर (८९२८६४६७४६) किंवा हरेंद्र ठाकरे (९६६५१०७६५८) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

MPSC Mega Bharti : एमपीएससीकडून 2,619 जागांसाठी मोठी भरती! 'या' पदांसाठी होणार परीक्षा, ऑनलाईन अर्ज सुरू; सीमाभागातील उमेदवारांनाही संधी

Mumbai News: फेरीवाला परवान्यांवर न्यायालयाचे ताशेरे, एकाच कुटुंबाला अनेक परवाने; पालिकेला फटकारले

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

SCROLL FOR NEXT