Mitali Bhoyar from Nagpur got silver medal in state athletics competition  
नागपूर

जीवनाच्या प्रवासात अर्ध्यावरच सोडून गेले वडील तरी 'तिनं' मानली नाही हार; ॲथलेटिक्स स्पर्धेत जिंकलं रौप्यपदक 

नरेश शेळके

नागपूर ः ऑटोचालक असलेल्या वडिलांचा अचानक मृत्यू झाला. तरीही मिताली दीपक भोयरने सरावात खंड पडू दिला नाही आणि केवळ दोन महिन्याच्या आत राज्य ज्युनिअर ॲथलेटिक्स स्पर्धेत १८ वर्षाखालील मुलींच्या १५०० मीटर शर्यतीत रौप्यपदक जिंकून आपली गुणवत्ता सिद्ध केली. या पदकासोबतच तिने राष्ट्रीय स्पर्धेसाठी असलेली पात्रताही पार केली. राज्य स्पर्धा सध्या संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल पुणे येथे सुरू आहे.

गेल्या २९ नोव्हेंबर रोजी मितालीच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यामुळे तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. अशा परिस्थितीत प्रशिक्षक जितेंद्र घोरदडेकर आणि नवमहाराष्ट्र क्रीडा मंडळाच्या इतर सदस्यांनी तिला मानसिक आधार दिला. परिवारातील इतर सदस्यांनीही तिला प्रोत्साहनच दिले. त्यामुळेच ती नियमीत सराव करू शकली. राज्य स्पर्धेपूर्वी झालेल्या जिल्हा निवड चाचणी स्पर्धेत अव्वल स्थान मिळवून मितालीने आपण राज्य स्पर्धेसाठी सज्ज आहो, हे दाखवून दिले होते. सडपातळ शरीरयष्टी असलेल्या मितालीच हे राज्य स्पर्धेतील सलग दुसरे पदक होय. नोव्हेंबर २०१९ मध्ये डेरवण येथे झालेल्या स्पर्धेत १६ वर्षे मुलींच्या दोन हजार मीटर शर्यतीत तिने ब्राँझपदक जिंकले होते.

नवमहाराष्ट्र क्रीडा मंडळाची खेळाडू आणि पंडित बच्छराज व्यास ज्युनिअर महाविद्यालयाची विद्यार्थिनी असलेल्या मितालीने शर्यत ५ मिनिटे ०४.०० सेकंदात पूर्ण केली आणि राष्ट्रीय स्पर्धेसाठी असलेली ५ मिनिटे ११ सेकंदाची पात्रता पार केली. राष्ट्रीय स्पर्धा गुवाहाटी येथे सहा फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. येत्या २८ जानेवारी रोजी आपला वाढदिवस साजरा करणारी आणि ईश्वर देशमुख शारिरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मैदानावर सराव करणारी मिताली शर्यतीविषयी म्हणाली, ‘‘शर्यतीची सुरुवात छान झाली. सुवर्णपदक जिंकणाऱ्या धावपटूसोबतच मी धावत होती. मात्र, नंतर तिने वेग वाढविल्याने मी तिची बरोबरी करू शकली नाही. 

राज्य स्पर्धेत प्रथमच रौप्यपदक जिंकल्याचा आनंद आहे.‘‘ प्रशिक्षक जितेंद्र घोरदडेकर यांनीही मितालीच्या कामगिरीचे कौतुक केले. पंधराशे मीटर शर्यतीत तिची सहकारी जयश्री बोरेकरला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. या कामगिरीबद्दल दादोजी कोंडदेव पुरस्कार विजेते प्रशिक्षक भाऊ काणे, प्रा. धनंजय काणे, नवमहाराष्ट्र क्रीडा मंडळाचे सचिव प्रशांत जगताप, शिरीष भगत, ईश्वर देशमुख शारिरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्राचार्य शरदा नायडू, जिल्हा संघटनेचे सचिव शरद सूर्यवंशी यांनी मितालीच अभिनंदन केले.

दरम्यान, २० वर्षाखालील मुलींच्या तीन हजार मीटर शर्यतीत रवींद्र टोंग यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणाऱ्या रिया दोहतरेने सुवर्णपदक जिंकले. तिने शर्यत १० मिनिटे ५०.२० सेकंदात पूर्ण केली. हे तिचे स्पर्धेतील दुसरे पदक होय. ती ट्रॅकस्टार क्लबची खेळाडू आहे. १८ वर्षाखालील मुलींच्या पाच किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत तुलसी चौधरीने रौप्यपदक जिंकले. ती जय ॲथलेटिक्स क्लबची खेळाडू असून सुनील कापगते यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.

संपादन -  अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anil Parab : मनसे-ठाकरे गटाची युती होणार? अनिल परब यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, 'आजचा हा मेळावा म्हणजे...'

Latest Maharashtra News Updates : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन मनसैनिक मराठी भाषा जल्लोष उत्सव कार्यक्रमाला रवाना

Marathi Bhasah Vijay Melava : मुंबईत राजकीय वातावरण तापलं, दादरमध्ये मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात...

Gold Rate Today: सोने-चांदीच्या किंमतीत पुन्हा उसळी! महाराष्ट्रात 24 कॅरेट सोने 1 लाखाच्या पुढे, जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव

Shubhanshu Shukla : शुभांशु शुक्लांचा विद्यार्थ्यांशी अंतराळातून थेट संवाद, दिली 'ही' आश्चर्यकारक माहिती..

SCROLL FOR NEXT