MLA Abhijit Vanjari Corona Positive 
नागपूर

महाविकासआघाडीचे पदवीधर आमदार ॲड. अभिजित वंजारी कोरोना पॉझिटिव्ह

मंगेश गोमासे

नागपूर : नागपूर पदवीधर मतदारसंघातील महाविकासआघाडीचे नवनिर्वाचित आमदार ॲड. अभिजित वंजारी यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने इस्पितळात उपचारार्थ दाखल झाले आहे. विशेष म्हणजे त्यांचे प्रतिस्पर्धी महापौर संदीप जोशी यांनासुद्धा करोनाची लागण झाली आहे.

अभिजित वंजारी यांनी नुकतीच आमदारकीची शपथ घेतली आहे. १४ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात ते सहभागी होणार होते. मात्र, त्यांना पहिल्याच अधिवेशनाला करोनामुळे मुकावे लागणार आहे. विशेष अधिवेशनासाठी सर्व आमदारांना कोरोना चाचणी करणे बंधनकारक केले आहे. सुमारे महिनाभर ते निवडणुकीच्या प्रचारात होते.

यानिमित्त त्यांना पूर्व विदर्भातील सहा जिल्हे पालथे घातले. या दरम्यान झालेल्या गाठीभेटी आणि शपथविधीसाठी त्यांनी मुंबईचे वारी केली. कोणाच्या तरी संपर्कातून त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. थोडा ताप आल्याने त्यांनी कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह निघाली.

संदीप जोशींना केले होतो पराभूत

नागपूर पदवीधर मतदारसंघातून महाविकासआघाडीचे उमेदवार अभिजित वंजारी तब्बल १८,७१० मतांनी निवडून आले होते. अभिजित वंजारी यांना ६१,७०१ मते मिळाली होती. तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे संदीप जोशी यांना ४२,९९१ मते मिळली. अभिजित यांच्या राजकीय कारकीर्दीमधील पहिलाच विजय आहे. यापूर्वी त्यांनी दोन विधानसभा निवडणुका, एक महापालिका निवडणूक लढविली होती. मात्र, त्यामध्ये त्यांना अपयश आले होते.

पहिल्या निवडणुकीत झाले होते पराभूत

अभिजित वंजारी यांचा जन्म १० मे १९७३ रोजी झाला. त्यांनी नागपुरातून माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी एलएलबी केले. त्यांनी महाविद्यालयीन जीवनात १९८८ ते २००२ पर्यंत या काळात एनएसयुआयचे जनरल सेक्रेटरी म्हणून काम पाहिले. अभिजित वंजारी यांचे वडील गोंविदराव वंजारी आमदार होते. त्यामुळे त्यांनी पहिल्यांदा काँग्रेसचे उमेदवारीवर महापालिका निवडणूक लढविली. मात्र, त्यात त्यांना अपयश आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"भारताच्या भविष्यासाठी!" टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलची पोस्ट; इरफान पठाणही म्हणतो, कोणत्याही 'पेपर लीक'मुळे...

Paper Leak Fast-Track Courts: पेपरफुटीवर फास्ट ट्रॅक न्यायालयात सुनावणी; दोषींना कठोर शिक्षा होणार : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

Mumbai News: मोतीलाल नगर पुनर्विकासाची मालकी म्हाडाकडेच; अदाणी फक्त विकासक, म्हाडाचे स्पष्टीकरण

Pune Treefall : स्वारगेट पोलिस लाइनमध्ये वडाचे प्रचंड झाड कोसळून १०-१५ दुचाकींचे नुकसान, २३ दिवसांत शहरात ३७२ झाडपडीच्या घटना

Pune Dry Waste Project: पुण्यात ३०० मेट्रिक टन सुका कचरा प्रकल्पाला स्थायीत बहुमताने मंजुरी; भाजप-काँग्रेस आमनेसामने

SCROLL FOR NEXT