MLA Datke said it is unfortunate to support such commissioners 
नागपूर

मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना रोखायचा नागपूरचा विकास! कोणी केला हा आरोप आणि का?

राजेश प्रायकर

नागपूर : तुकाराम मुंढे यांनी नागपूर महापालिकेचे आयुक्त म्हणून कार्यभार हाती घेतल्यानंतर शहर अधोगतीकडेच चालले आहे. त्यांनी विनाकारण विकासकामे थांबविली आहेत. लोकप्रतिनिधींना चिल्लर समजणाऱ्या आणि "हम करे सो कायदा', असे वागणाऱ्या आयुक्तांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाठिशी घालणे अतिशय दुर्दैवी आहे, असे आमदार प्रवीण दटके म्हणाले. 

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी नुकताच एका मुलाखतीत आयुक्त तुकाराम मुंढे यांची पाठराखण केली होती. यावरून महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी पत्रकारपरिषद घेऊन मुख्यमंत्र्यांवर शरसंधान साधले. सत्तापक्ष नेते संदीप जाधव यांच्या कक्षात झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार दटके यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पात अनियमितता केली, सभागृहातील निर्देश पायदळी तुडविले, विकास कामे रोखली, अशा आयुक्तांची पाठराखण करणे ही दुर्देवी बाब असल्याचे सांगितले.

शहरातील कॉंगेस आमदार विकास ठाकरे यांनीही मुख्यमंत्र्यांनी दुसरी बाजू समजून घ्यावी, असे सांगितले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी निश्‍चितच दुसरी बाजूही पहावी. पालिकेची आर्थिक स्थिती यापूर्वीही वाईटच होती. परंतु, त्यावेळी असलेल्या आयुक्तांनी नियोजनातून शहराचा विकास साधला.

गेली पाच वर्षे सोडली तर राज्यात राष्ट्रवादी-कॉंग्रेसची सरकार होती. परंतु, त्या काळातही शहराचा विकासाचा वेग कायम होता, याकडेही आमदार दटके यांनी लक्ष वेधले. मुख्यमंत्र्यांनी दुप्पट गतीने शहराच्या विकासाकडे लक्ष द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, सुनील अग्रवाल उपस्थित होते.

दुसरी बाजू समजून घ्या

मुख्यमंत्री कोण्या एका पक्षाचे नसतात. ते राज्यातील जनतेचे असतात. त्यांनी उपराजधानीच्या विकासाकडेही लक्ष देण्याची गरज आहे. परंतु, शहरातील विकासकामे थांबविणाऱ्या आयुक्तांच्या पाठीमागे असल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांनी नागपूरचा विकास रोखण्याची भूमिकाच स्पष्ट केली. त्यामुळे या प्रकरणाची दुसरी बाजूही त्यांनी समजून घ्यावी, अशी अपेक्षाही आमदार दटके यांनी व्यक्त केली. 

पाठराखण करणे दुर्दैवी

गेल्या पाच वर्षांत शहराचा वेगाने विकास झाला. परंतु, हा विकास रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आयुक्त तुकाराम मुंढे यांची पाठराखण करीत आहे. जो अधिकारी मी म्हणेल तो कायदा, असे वागतो. त्याची पाठराखण करणे दुर्दैवी असल्याची पुस्तीही दटके यांनी जोडली. 

संपादन - नीलेश डाखोरे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nobel Prize 2026: वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कारांची घोषणा! 'या' तीन दिग्गज व्यक्तींच्या नावांचा समावेश

निरागस वासू साकारला, आता नजर खलनायकाच्या भूमिकेवर; राज कुंदन म्हणतो, “मला पुढे मांजरेकर सरांसोबत...”

Mohan Joshi : मोहन जोशी हे महाराष्ट्राचा अभिमान ;उद्योगमंत्री उदय सामंत : संगीतसूर्य केशवराव भोसले पुरस्काराने सन्मान

भाजपने राज्यसभेच्या ८ उमेदवारांची केली घोषणा, केंद्रीय मंत्र्यांसह दिग्गजांचा पत्ता कट; योगींच्या मंत्र्याची वर्णी

Latest Marathi News Live Update : शिक्षक भरतीत लाखोंची फसवणूक, अपूर्व हिरेंसह पाच जणांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT