file photo 
नागपूर

कोरोनासाठी आमदार निधी मिळालाच नाही, सलील देशमुखांना टोला

नीलेश डोये

नागपूर ः कोरोना नियंत्रण करता आवश्‍यक साहित्यासाठी आमदार निधीच जिल्हापरिषदा मिळाला नाही, असे स्पष्टीकरण उपाध्यक्ष व आरोग्य समिती सभापती मनोहर कुंभारे यांनी आज पत्रकार परिषदेत दिले. साहित्यच खरेदीच झाले नाही तर गायब कुठून होणार, असा सवाल करीत सलील देशमुख यांचे आरोप बिनबुडाचे असल्याचे ते म्हणाले. 

कोरोनासाठी आमदार फंडातून प्रती आमदार 20 रुपये मिळाले. यातून खरेदी करणारे साहित्य गायब असल्याचा आरोप जि.प.सदस्य सलील देशमुख यांनी केला होता. देशमुख यांचा आरोप उपाध्यक्ष कुंभारे यांनी खोडून काढला. गृहमंत्री अनिल देशमुख, आमदार टेकचंद सावरकर व समीर मेघे यांनी प्रत्येकी 10-10 लाख रुपये देण्याचे पत्र दिले.

तर इतर आमदारांनी निधीच दिला नाही. पण हा निधी अद्याप मिळाला नाही. या निधीतून साहित्य खरेदीचे अधिकारी जिल्हाधिकारी यांना आहे. परंतु अद्याप एकही रुपयाचे साहित्य खरेदी करण्यात आली नाही. देशमुख यांचा आरोप चुकीचा आहे. अपूर्ण माहितीच्या आधारे त्यांनी मुद्दा उपस्थित केला. सदस्यांनी पूर्ण माहिती घेवून बोलायचा पाहिजे, असे ते म्हणाले. काही आमदारांनी निधी देण्याचे पत्रच परत घेतल्याचा खुलासा त्यांनी केला. 


मंत्री केदारांच्या पुढाकाराने 20 लाख 
जिल्हा स्तरावर सॅनिटायझर, मास्क, पीपीई किट, थर्मल स्क्रिनिंग मशीन आदी साहित्य खरेदीकरीता सर्वप्रथम पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी जिल्हा खनीज निधीतून 20 लाखांचा निधी उपलब्ध करून दिला. यानिधीतून साहित्यांची खरेदी झाली. त्याचाच उपयोग होत आहे. जि.प.च्या सेसफंडात 58 लाखांची तरतूद करण्यात आली असून 5 लाख रुपयातून इन्फ्रारेड थर्मामिटरची खरेदी करून प्राथमिक आरोग्य केंद्र (पीएचसी) देण्यात आली. तर उर्वरित निधीतून औषध व इतर साहित्य खरेदीबाबत निवीदा प्रक्रिया राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Municipal Election 2026 Results Live: सत्ता कुणाची? महाराष्ट्रातील २९ महापालिकांचे निकाल आज, राजकीय भवितव्य ठरणार

Solapur Accident: फळवणीत विचित्र अपघात; दोघांचा मृत्यू, दोन गंभीर तर दहाजण जखमी, मकर संक्रांतीच्या रात्रीची घटना!

Pune Municipal Election : पुण्यामध्ये ५३ टक्के मतदान! वाढलेल्या पावणेचार लाख मतदानाचा फायदा कोणाला?

PCMC Election : पिंपरी चिंचवडमध्ये ६० टक्के मतदान; काही केंद्रांवर सायंकाळीही रांगा

आयुष्यातला गोडवा

SCROLL FOR NEXT