MLA hostel will be Kovid Center
MLA hostel will be Kovid Center 
नागपूर

नागपुरातील आमदार निवास होणार कोविड सेंटर

सकाळवृत्तसेवा

नागपूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शहरातील नागपूर महापालिकेची दवाखाने विकसित करण्यासोबतच महापालिकेचा पाचपावली दवाखाना, सदर दवाखाना, केटी नगर दवाखाना, इंदिरा गांधी रुग्णालय कोविड सेंटर तयार करण्यासंदर्भात हालचाली होत्या. परंतु, झाले वेगळेच. जसे मेडिकलच्या ट्रॉमा सेंटरला बदलून कोविड हॉस्पिटल तयार करण्यात आले त्याच धर्तीवर आता आमदार निवास विलगीकरण केंद्राला "कोविड सेंटर'मध्ये रूपांतर करण्यात येत आहे. 

शहरात सुमारे पंधरांपेक्षा अधिक विलगीकरण केंद्रे तयार करण्यात आली आहेत. आमदार निवास विलगीकरणाला कोविड सेंटर तयार करण्याचे संकेत असल्याने येथील प्रवेश बंद करण्यात आले आहेत. लक्षणे नसलेल्या कोरोनाबाधित रुग्णांना येथे भरती उपचारासाठी तसेच डॉक्‍टरांच्या निरीक्षणात ठेवण्यात येणार आहे. मात्र, पालिकेकडे डॉक्‍टरांची संख्या तोकडी आहे. मनपाकडे किती फिजिशियन आहेत हे सांगता येत नाही. असो साथीच्या आजारावर नियंत्रणाची जबाबदारी पालिकेची आहे. परंतु, पालिकेची आरोग्य यंत्रणा सक्षम नाही. ही सक्षम बनविण्यासाठी 1 कोटी 90 लाख एवढ्या निधीची आवश्‍यकता होती. या निधीतून पालिकेच्या पाचपावली दवाखाना, सदर दवाखाना, केटी नगर दवाखाना, इंदिरा गांधी रुग्णालय विकासाचा आराखडा तयार केला.

कोविड-19च्या पार्श्‍वभूमीवर पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी हा निधी पालिकेस देण्यास मंजुरी प्रदान केली आहे. या आर्थिक मंजुरीमुळे, नागपुरातील नागरिकांना पालिकेच्या रुग्णालयात अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होण्यास मोठा हातभार लागणार आहे. मात्र, मध्येच आमदार निवास विलगीकरण केंद्राला कोविड सेंटर म्हणून विकसित करण्यात येत असल्यामुळेच येथील प्रवेश बंद करण्यात आले. सध्या आमदार निवास विलगीकरण केंद्रात आता शंभरापेक्षा अधिक व्यक्ती आहेत. 

मेयो-मेडिकलवर येणार भार 

या कोविड सेंटरमध्येही मेडिकल, मेयो, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय तसेच आरोग्य विभागातील डॉक्‍टर, परिचारिकांसह इतर कर्मचाऱ्यांवरच भार येणार आहे. येथे रुग्णांच्या रक्तातील ऑक्‍सिजनचे प्रमाणासह इतर नाममात्र तपासणी होतील. ती नित्याने केली जाईल. काही परिणाम आढळल्यास तातडीने मेडिकल, मेयो किंवा एम्समध्ये दाखल करण्यात येणार आहे. आमदार निवासातील कोविड केअर सेंटरमध्ये सुमारे 350 खाटांची सोय केली जाणार आहे. प्रत्येक खोलीत दोघांना ठेवले जाणार आहे. या रुग्णांची येथे चहापासून जेवणापर्यंतची सोय केली जाईल. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT