MLAs are not invited to meeting of DPC meeting 
नागपूर

‘डीपीसी‘च्या बैठकीचे आमदारांना निमंत्रणच नाही; महापालिकेतील २० सदस्य अनभिज्ञ 

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दहा महिन्यानंतर जिल्हा नियोजन समितीची (डीपीसी) बैठक घेतली. परंतु या बैठकीला आमदार व सदस्‍यांना बोलाविण्यातच आले नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. 

डीपीसीची बैठक प्रत्येक तीन महिन्यांनी होणे आवश्यक आहे. परंतु गेली दहा महिने बैठक झाली नाही. जानेवारी महिन्यात पहिली बैठक झाली होती. त्यानंतर थेट डिसेंबर महिन्यात शुक्रवारला बैठक घेण्यात आली. दिवाळीपूर्वी नंतर बैठक घेण्यासाठी पालकमंत्र्यांकडे नियोजन विभागाकडून फाईल पाठविण्यात आली होती. दरम्यान विधान परिषद निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे बैठक झाली नाही. पालकमंत्री हे डीपीसीचे अध्यक्ष असतात. 

त्याच प्रमाणे जिल्ह्यातील इतर मंत्री, आमदार निमंत्रित सदस्य असतात. त्याच प्रमाणे मनपा, जिल्हा परिषद आणि नगर परिषदेमधील नगरसेवक, सदस्यांमधून निवडणुकीच्या माध्यमातून ४० सदस्यांची निवड होते. तर महापौर व जिल्हा परिषद अध्यक्ष पदसिद्ध सदस्य असतात. जिल्हा परिषद करता याच वर्षी निवडणूक झाली असून अद्याप डीपीसीवर सदस्यांची निवड करण्यासाठी निवडणूक झाली नाही.

महानगर पालिकेतील २० सदस्यांची निवड झाली आहे. परंतु एकाही सदस्याला बोलाविण्यात आले नाही. बैठकीत सदस्यांकडून निधी संबंधात अनेक मुद्दे उपस्थित करण्यात येते. या बैठकीला फक्त अधिकाऱ्यांनाच बोलावण्यात आले होते. 

बैठकीचे निमंत्रण नसल्याने गेलो नाही. विकास कामात सर्व पक्षांना सोबत घेण्याचा नागपूरची परंपरा आहे. पालकमंत्र्यांनी विकास कामात राजकारण करू नये. 
प्रवीण दटके, 
आमदार, भाजप 

सत्ताधाऱ्यांचा हा प्रकार विरोधकांचा आवाज दाबण्याचा असून लोकशाहीसाठी मारक आहे. या घटनेचा निषेध असून याची तक्रार करण्यात येईल. 
-ॲड. धर्मपाल मेश्राम, 
सदस्य, डीपीसी

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Election Nomination : पुणे महापालिका निवडणूक; पहिल्या दिवशी अर्ज भरण्याकडे उमेदवारांची पाठ!

आलिया- रणबीरच्या लग्नात 'या' गोष्टीच्या विरोधात होत्या नीतू कपूर; मुळीच आवडला नव्हता सुनेचा तो निर्णय

चित्रपट संस्कृतीचा मानदंड! २२व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाची सुरूवात; कधी आणि कुठे होणार सोहळा?

Jemimah Rodrigues बनली कर्णधार, आता स्मृती मानधना, हरमप्रीत कौरलाही देणार टक्कर! तीन वेळा उपविजेत्या ठरलेल्या संघाचा मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : सदानंद दाते लवकरच महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक!

SCROLL FOR NEXT