For mobile sister commits suicide by consuming poison 
नागपूर

मुलांच्या हट्टापोटी वडिलांनी घेतला स्मार्टफोन, बहीण-भाऊ दोघेही खूश; मात्र, आईने मध्यस्ती केल्याने मुलीची आत्महत्या 

अनिल कांबळे

नागपूर : मोबाईलसाठी भावाबहिणीमध्ये होणारे वाद सर्वश्रुत आहेत. मात्र, त्यामुळे रुसलेल्या बहिणीने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना हुडकेश्‍वरमधे उघडकीस आली. साक्षी जांबुवंतराव शेंदेकर (वय 19, रा. श्‍यामनगर, हुडकेश्‍वर रोड, नागपूर) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साक्षी शेंदेकर ही बिंझाणी कॉलेजमध्ये बी.ए. पदवीच्या द्वितीय वर्षाला शिक्षण घेत होती. तिला लहान भाऊ बारावीत शिक्षण घेतो. वडील जांबुवंतराव हे त्रिमूर्तीनगर चौकात खासगी कंपनीत कार्यरत आहेत. तर तिचा भाऊसुद्धा खासगी काम करतो. घरी स्मार्टफोन विकत घ्यावा म्हणून दोघेही बहीण-भावाने वडिलांकडे तगादा लावला होता. मुलांच्या हट्टापोटी वडिलांनी महिनाभरानंतर घरात स्मार्टफोन घेतला. दोघेही खूश होते. 

साक्षी आणि तिचा भाऊ आळीपाळीने मोबाईल वापरत होते. भाऊ घरी असला की तो तासभर मोबाईलवर पब्जी खेळत होता तर साक्षीही व्हॉट्‌सऍप आणि फेसबुकवर वेळ घालवत होती. परंतु, गेल्या काही दिवसांपासून दोघे बहीणभावातून मोबाईलसाठी भांडत होते. शनिवारी दुपारी बारा वाजता साक्षी आणि तिच्या भावामध्ये मोबाईला वापरण्यावरून वाद झाला. दोघांनाही एकाच वेळी मोबाईल वापरायचा होता. शेवटी आईने मध्यस्थी करीत भावाकडे मोबाईल देण्यास सांगितले. 

त्यामुळे साक्षीला राग आला. तिने आतमधल्या खोलीत जाऊन विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. तासभर झाला तरी साक्षी बाहेर आली नाही, म्हणून तिच्या आईने घरात जाऊन बघितले असता तिच्या तोंडातून फेस बाहेर पडत होता. आईने लगेच शेजाऱ्यांच्या मदतीने साक्षीला खासगी रुग्णालयात नेले. प्रकृती चिंताजनक असल्यामुळे तिला मेयोत दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान साक्षीचा मृत्यू झाला. या प्रकरणी हुडकेश्‍वर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. 
 

मोबाईलचा मोह टाळा 
मोबाईलचा मोह टाळायला हवा. पालकांनी विशेष करून याकडे लक्ष द्यायला हवे. सध्या स्मार्टफोनवर गेम खेळण्याची सवय मुलांना जडलेली आहे. त्यातून मोबाईलचे वेड लागते. कालांतराने मोबाईल न मिळाल्यास त्याला नैराश्‍य येते. त्यातून नकारात्मक विचार डोक्‍यात येतात. अशातून वाईट घटना घडतात. त्यामुळे अनर्थ टाळण्यासाठी पालकांनी वेळीच सावध भूमिका घ्यायला हवी. 
-प्रा. राजा आकाश, मानसोपचारतज्ज्ञ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rain Update: पाऊस थांबायचं नाव नाही! पुण्यात दरड कोसळली, नाशिकला ढगफुटीचा इशारा अन्...; आज कुठे काय घडलं? वाचा संपूर्ण अपडेट

IND vs ENG, 3rd T20I : भारताविरुद्ध आघाडी घेण्यासाठी इंग्लंडचा संघ सज्ज! सामन्यासाठी यजमानांची Playing XI जाहीर

11th Special Round Extended: अतिवृष्टीचा फटका: अकरावी प्रवेशाच्या पहिल्या विशेष फेरीची मुदत बुधवारीपर्यंत वाढ, सुधारित वेळापत्रक जाहीर

Pune Heavy Rain Alert: कर्जत घाटात दरडींचा तडाखा; मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक ठप्प, १६ गाड्या रद्द

U19 IND vs SL : ९ चौकार अन् १ षटकार... द्रविडच्या लेकाची जोरदार फटकेबाजी; पण श्रीलंकेने सामना जिंकत केली ODI मालिकेत बरोबरी

SCROLL FOR NEXT