Mock drill at Nagpur International Airport 
नागपूर

हायजॅक विमानातून प्रवाशांची सुटका; पाच दहशतवाद्यांचा खात्मा!

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : दहशतवाद्यांनी हायजॅक केलेले विमान डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळावर उतरवून घेतले. सुरक्षा यंत्रणांनी विमानातील पाचही दहशतवाद्यांना कंठस्नान घालत सर्व 119 प्रवासी व क्रुमेंबर्सची सुखरूप सुटका केली. हा थरारक घटनाक्रम मंगळवारी नागपूर विमानतळावर घडला. 

पाच दहशतवाद्यातील जयपूर येन जयपूर-चेन्नई विमान हायजॅक केले. त्यात तीन लहान मुलांसह 112 प्रवाशी आणि सात विमानातील कर्मचाऱ्यांचा समावेश होता. दुपारी 11.30 वाजता हे विमान नागपूर विमानतळावर उतरवून घेण्यात आले. परिस्थितीवर नियंत्रणासाठी पोलिस आयुक्त डॉ. उपाध्याय यांच्या अध्यक्षतेखाली एरोम समिती स्थापन करण्यात आली. यात संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला. 

समिती सदस्यांनी दहशतवाद्यांशी वाटाघाटी सुरू केल्या. 250 मिलियन डॉलर, तिहार जेलमध्ये बंधिस्त असणाऱ्या चार जहाल दहशतवाद्यांची मुक्तता, त्याना सुखरूप सोडण्याची व्यवस्था, पंतप्रधान व केंद्रीय गृहमंत्र्यांसोबत चर्चा करू द्यावी आदी त्यांच्या मागण्या होत्या. दहशतवाद्यांसोबत चर्चा सुरू असतानाच सीआयएसएफ व पोलिसांच्या शिघ्र कृती दलाला पाचारण करण्यात आले. दोन्ही पथकांनी आपसात समन्वय करीत पाचही दहशतवाद्यांचा खात्मा केला.

बॉम्व शोधक व नाशक पथकाकडून विमानाची तपासणी करण्यात आली. सरतेशेवटी सर्व प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली. अवघ्या एक तास 20 मिनिटांमध्ये हे ऑपरेशन फत्ते करण्यात आले. यामुळे विमानातील सर्व प्रवाशांनी निश्‍वास सोडला. 

मॉकड्रीलमुळे पसरली भीती

दहशतवाद्यांनी विमान हायजॅक केल्यास काय करावे आणि काय करू नये याची माहिती होण्यासाठी नागपूर विमानतळावर मॉकड्रील करण्यात आले. पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, मिहान इंडियाचे वरिष्ठ विमानतळ संचालक आबीद रुही यांच्या मार्गदर्शनात हे मॉकड्रील झाले. यातून सहकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. मात्र, यामुळे विमानतळावर काय सुरू आहे, असा प्रश्‍न नागरिकांच्या मनात उपस्थित होत होता. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadanvis Statement : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्र्यांनी मौन सोडलं, खात्यांचा पदभार सोपवला

IND U19 vs SL U19 SF Live: भारत-श्रीलंका सामना रद्द झाल्यास कोण जाईल फायनलला? बांगलादेशकडून पाकिस्तानचा करेक्ट कार्यक्रम

Latest Marathi News Live Update : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात

Epstein Files Explained : मोदी सरकार कोसळणार? एपस्टीन फाइल्स काय आहे, भारतातील नेते का घाबरले? संपूर्ण माहिती एका क्लिकवर...

Success Story: रामटेकच्या कार्तिक बावनकुळेचा युपीएससीत डंका; आयआयटी जमले नाही, युपीएससीला घातली गवसणी

SCROLL FOR NEXT