नागपूर

जीवित, वित्तहानी टाळण्याला प्राधान्य : विजय वडेट्टीवार

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : अतिवृष्टी, महापूर, चक्रीवादळे अशा लागोपाठ विविध नैसर्गिक आपत्तींशी तोंड द्यावे लागत आहे. त्यामध्ये होणारी जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी राज्य आपत्ती कृती दलासाठी अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. प्रत्येक जिल्ह्यात ही यंत्रणा सुसज्ज राहील, यावर भर दिल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी दिली.

हिंगणा येथील राज्य राखीव पोलिस दल परिसरातील राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या कार्यालयात भेट दिली. तसेच नैसर्गिक आपत्तीच्या काळात करावयाच्या उपाययोजनांबाबत माहिती घेतली. अंबाझरी तलावात आपत्त‍ी व्यवस्थापनासंदर्भात मॉकड्रीलच्या सादरीकरणाचीसुद्धा वडेट्टीवार यांनी पाहणी केली.

विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा, जिल्हाधिकारी विमला आर. राज्य राखीव पोलिस दलाचे उपमहानिरीक्षक महेश घुर्ये, समादेशक पंकज डहाणे यांच्यासह उपविभागीय अधिकारी इंदिरा पखाले, उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे, विभागीय आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नितेश भांबोरे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे उपस्थित होते.

नैसर्गिक आपत्तींचा सामना करताना जीवितहानी होणार नाही, याला प्राधान्य देण्यात येत आहे. त्यादृष्टीने यंत्रणा सुसज्ज करण्यात आली आहे. हिंगणा येथील कार्यालयामध्ये सोमवारी त्याबाबत आवश्यक बाबींचा आढावा घेतला. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या धर्तीवर बळकटीकरण करण्यास विभागाचे प्राधान्य असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

नागपूर जिल्ह्याला सहा बोटी

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाकडून राज्य आपत्ती प्रतिसाद दलातील जवानांना प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे हा विभाग तांत्रिकदृष्‍ट्या अत्याधुनिक करण्यात येणार आहे. हे दल अत्याधुनिक झाल्यास नैसर्गिक आपत्तीकाळात प्राण वाचविण्यासाठी मजबूत टीम यशस्वीपणे सामना करू शकते. या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्ह्याला सहा बोटी मिळाल्या आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या या दोन्ही दलांच्या सहाय्याने राज्यात नैसर्गिक संकटांना तोंड देणे सोपे होणार असल्याचे विजय वडेट्टीवार म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT