Monsoon and Children's Health Sakal
नागपूर

Monsoon and Children's Health : मुलांना पावसाळा एन्जॉय करू द्या...सोपे नियम पाळा, फिट अँड फाईन राहा

Child Health Care : विशेषतः पावसाळ्यात हवेत बदल होत असल्यानेच मुलांना विविध आजार घेरतात. साधारणतः शून्य ते चौदा आणि त्यापुढील मुलांमध्येही पावसाळ्यात आजारांमध्ये वाढ झालेली दिसते.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : ‘ये रे ये रे पावसा, तुला देतो पैसा'' असं म्हणतं बच्चे कंपनी पावसाचं नेहमीच स्वागत करतात. शाळेभोवती तळं साचून सुट्टी मिळेल का, असा थेट भोलानाथालाच प्रश्‍न करतात. पावसात भिजता येतं, गरमागरम भजी खायला मिळतात. पावसाळा असा चिमुकल्यांसाठी आनंद घेऊन येतो; पण हाच पावसाळा विविध प्रकारचे आजार आणतो.

विशेषतः पावसाळ्यात हवेत बदल होत असल्यानेच मुलांना विविध आजार घेरतात. साधारणतः शून्य ते चौदा आणि त्यापुढील मुलांमध्येही पावसाळ्यात आजारांमध्ये वाढ झालेली दिसते. यामुळे मुलांना पावसाळा एन्जॉय करू द्या, परंतु त्यांना फिट आणि फाईन ठेवण्यासाठी त्यांच्या जिभेला हसत खेळत आवर घालण्याची जबाबदारीही पालकांनी पार पाडावी.

पावसाळ्यात ज्या मुलांना दमा, सतत सर्दी-पडशाचा त्रास असेल विशेष लक्ष देण्याची गरज असते. स्वच्छतेचा अभाव आणि इतर पर्यावरणाशी संबंधित गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यास पोटाचे विकार, श्‍वसन विकार आणि निगडित विकारात वाढ होते.

नियम कोणते पाळावे?

  • पावसाळ्यात पचायला हलके असणारे अन्न खावे

  • आहार घेताना गरम पदार्थ खावेत

  • बाहेर रस्त्यावरचे, हॉटेलमधील पदार्थ खाणे टाळावे

  • खायची वेळ आलीच तर गरम सूपसारखे पदार्थ घेऊ शकतो

  • शक्यतो तळलेले, मसालेदार पदार्थांना नकार द्यावा

  • पचायला जड पदार्थ म्हणजे उसळ खाणे कमी करा

  • पचनशक्ती कमी असेल, पित्त होत असेल तर उसळ खाऊ नये

  • पोट बिघडते अशा व्यक्तींनी पालेभाज्या खाणं टाळलेलंच बरं

  • वडे, भजी हे पदार्थ शक्यतो टाळावे

  • ठेचा, मिरच्या, खूप तिखट झणझणीत न खाणेच बरं

मुलांसाठी हे करा...

  • लहान मुलांना पावसाळ्यात गाळून आणि उकळून पाणी द्यावे.

  • मुलांना जेवण भरवताना हात स्वच्छ धुतलेले असावे.

  • बाळाला भरवण्यासाठी वाटी चमचाही उकळून घ्यावा.

  • मलमूत्र विसर्जन झाल्यावर साबणाने हात स्वच्छ धुवावे.

  • घराच्या आसपास जुने टायर, कूलरची टाकी, फुटलेले मडके यात पाणी साचू देऊ नये.

  • झोपताना मच्छरदानीचा वापर करावा.

लहान मुले आजारी असताना त्यांना शाळेत पाठवू नये कारण त्याने साथीचे रोग पसरण्याचा धोका असतो. निरोगी लहान मुलांना रुग्णालयात व दवाखान्यात केवळ भेटण्यासाठी घेऊन जाऊ नये. लहान मुलांना गर्दीच्या ठिकाणी नेऊ नये. हवेतून पसरणाऱ्या आजारांचा त्यांना लगेच संसर्ग होऊ शकतो.

-डॉ. उदय बोधनकर, ज्येष्ठ बालरोग तज्ज्ञ, नागपूर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyber Scam: ‘वॉटर बिल अपडेट करा अन्यथा पाणी बंद’ अशा धमकीने; उद्योजकाला ५४ लाखांचा गंडा

CM Devendra Fadnavis: रस्ता रुंदीकरणाला पाठिंबा; मुख्यमंत्री फडणवीस; गरज असेल तिथे भूसंपादन

Illegal Sand Mining: सुखना नदीतून वाळू उपसा करणारे जेरबंद; पाचजणांवर गुन्हा; पाच ट्रॅक्टरसह तीस लाखांचा मुद्देमाल जप्त

Manmad News : इंदूर-पुणे महामार्गावर कंटेनर अपघात; मनमाडजवळ वाहतुकीचा खोळंबा, प्रवाशांचे हाल

Latest Marathi News Updates : पालकमंत्री अतुल सावे यांची गाडी गावकऱ्यांनी अडवली

SCROLL FOR NEXT