Monsoon in Vidarbha in the third week of June 
नागपूर

मॉन्सूनचा प्रवास अपेक्षेप्रमाणे, या तारखेला होणार विदर्भात दाखल

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : गुरुवारी कर्नाटकच्या किनारपट्टीत दाखल झालेल्या मॉन्सूनचा प्रवास अपेक्षेप्रमाणे वेगाने सुरू असल्यामुळे विदर्भात मॉन्सूनचे आगमन निर्धारित वेळेत होण्याची दाट शक्‍यता आहे. सध्याची वाटचाल लक्षात घेता, जूनच्या तिसऱ्या आठवड्यात मॉन्सूनचे विदर्भात आगमन अपेक्षित आहे. तसे संकेत प्रादेशिक हवामान विभागाने दिले आहे.

एक जूनला केरळमध्ये आगमन झाल्यानंतर अरबी समुद्रात उसळलेल्या "निसर्ग' चक्रीवादळामुळे मॉन्सूनला गती मिळाली असून, मॉन्सूनचा प्रवास योग्य दिशेने सुरू आहे. कर्नाटक व गोव्यातील अनेक भागांत जोरदार पाऊस झाल्याची माहिती आहे. पोषक वातावरण पुढेही कायम राहिल्यास येत्या 15 ते 18 जूनदरम्यान विदर्भात मॉन्सून धडक देण्याची शक्‍यता असल्याचे हवामान विभागाचे संचालक मोहनलाल साहू यांनी सांगितले.

तथापि मॉन्सून विदर्भात नेमक्‍या कोणत्या तारखेला येईल, याविषयी त्यांनी ठामपणे सांगितलेले नाही. त्यासंदर्भात दोन- तीन दिवसांआधीच कळविण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. सामान्यत: विदर्भात मॉन्सून 15 जूनपर्यंत येतो. गतवर्षी आठवडाभर उशिरा म्हणजेच 21 जूनला आगमन झाले होते. उशिरा आगमन होऊनही सरासरीच्या (943 मिलिमीटर) 112 टक्‍के (1057 मिलिमीटर) पाऊस बरसला होता. भारतीय हवामान विभागाने यंदाही सरासरी पावसाचा अंदाज वर्तविला आहे.


निसर्ग चक्रीवादळामुळे गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यभर मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बसरल्या. मुंबई, पुण्यासोबतच विदर्भाला पावसाने झोडपून काढले. पावसामुळे वातावरणात गारवा पसरला असून, गेल्या काही दिवसांपासून तापमानातही कमालीची घट झाली. आगामी काळात पूर्वमोसमी पावसाच्या सरी बरसणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जिम बंद केलं, आठवड्यात साहित्य विकायचं होतं, दगडूशेठ मदतीला धावला... 'कृष्णाईच्या लेकी' अभिनेत्याने सांगितला अनुभव

Gangapur Maize Crop Crisis : करपलेली मका मुरघाससाठी विकण्याची वेळ ; उत्पादन खर्चही निघणे कठीण; पश्चिम महाराष्ट्र-कर्नाटकातून चाऱ्यासाठी मागणी

Kolhapur Mumbai Special Train : दिवाळीत गावी जाणाऱ्यांसाठी खूशखबर! मध्य रेल्वेकडून कोल्हापूर ते मुंबई, कलबुर्गीसाठी विशेष गाड्या जाहीर; पाहा रेल्वे गाड्यांचं वेळापत्रक

Gyanesh Kumar Petition : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या अडचणीत वाढ; थेट कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल, 'ते' 14 निर्णय वादाच्या भोवऱ्यात

Pune Ganesh Visarjan 2026 : कसबा ते दगडूशेठ... पुण्यात आज गणरायाला निरोप; विसर्जन मिरवणुकीसाठी जय्यत तयारी

SCROLL FOR NEXT