more than five thousands students apply for post graduation courses in nagpur university 
नागपूर

पदव्युत्तर प्रवेशासाठी साडेपाच हजारांवर अर्ज, १२ डिसेंबर शेवटची तारीख

मंगेश गोमासे

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयातील पदव्युत्तर प्रवेश प्रक्रिया शनिवारपासून (ता. ५)पासून सुरू करण्यात आली. दोन दिवसांत ५ हजार ६०१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी ८१९ विद्यार्थ्यांनी अर्ज निश्चित केले आहेत. विद्यार्थ्यांना १२ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येईल. यंदा पदवी परीक्षेच्या निकालात सुमारे ५० टक्क्यांपर्यंत वाढ नोंदविली गेली आहे. यामुळे काही विषयांमध्ये प्रवेशासाठी गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

नागपूर विद्यापीठाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा अंतिम वर्षांच्या परीक्षा ऑनलाइन घेतल्या. आतापर्यंत ८० टक्क्यांहून अधिक विषयांचे निकाल लागले आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रवेश देण्यासाठी ५ डिसेंबरपासून विद्यापीठात ऑनलाइन केंद्रभूत प्रक्रिया राबविली जाणार आहे. प्रवेश प्रक्रियेत एमएस्सी, एम.कॉम., एम.कॉम. प्रोफेशनल, एलएलएम, एमसीटी, मास्टर ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, एमसीएम, एमआयआरपीएम यांसारख्या अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

दोन टप्प्यांत प्रवेश पूर्ण होतील. विद्यापीठाच्या अधिसूचनेनुसार विद्यापीठाच्या पदव्युत्तर शैक्षणिक विभागांसह संलग्नित महाविद्यालयांतील पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी ऑनलाइन प्रवेश होतील. विद्यापीठ स्तरावर दोन टप्प्यांतील प्रवेश पूर्ण झाल्यानंतर उर्वरित जागांवर महाविद्यालय स्तरावर प्रवेश होतील. यानंतर जागा रिक्त राहिल्यास विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीनुसार प्रवेश दिले जातील. विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी ५ ते १२ डिसेंबरपर्यंत www.rtmnu.university या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. १६ डिसेंबरला तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. त्यानंतर १८ डिसेंबरपर्यंत त्यावर आक्षेप नोंदविता येऊ शकेल. २० डिसेंबरला अंतिम यादी जाहीर होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Award List: ऑरेंज-पर्पल कॅप आणि बक्कळ पैसा... पुरस्कार सोहळ्यातही वैभव सूर्यवंशीचाच डंका! पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

IPL 2026 Final: "जितेश राव, कसं वाटतंय?" हर्षा भोगलेंच्या प्रश्नावर RCB च्या Jitesh Sharma चं मराठीतून उत्तर; म्हणाला...

Virat Kohli Reaction : "आता मॅच जिंकवण्यासाठी मला एकट्यालाच मैदानात उतरावं लागत नाही!" विराट कोहली भावुक

Vaibhav Sooryavanshi : १५ वर्षाच्या पोराने मैदान गाजवले... Orange Cap सह ५ पुरस्कार जिंकल्यानंतर म्हणाला, या पर्वात शिकलो की...

IPL 2026: वैभव सूर्यवंशीला ५ पुरस्कार अन् पैशांचा पाऊस! १५ वर्षांच्या पोराला कारसह BCCI कडून किती रुपयांचे बक्षीस मिळाले?

SCROLL FOR NEXT