Nagpur Rural News Nagpur Rural News
नागपूर

नागपूर : नाल्याच्या पुरात माय-लेकी गेल्या वाहून; आईचा मृतदेह सापडला

सकाळ डिजिटल टीम

हिंगणा एमआयडीसी (जि. नागपूर) : आषाढी एकादशीला नागपूर जिल्ह्यातील तीन मित्र पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेले होते. यातील दोघांचा चंद्रभागा नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू (died) झाला. ही घटना ताजी असताना सोमवारी (ता. ११) नाल्याच्या पुरात वाहून गेल्याने माय-लेकीचा मृत्यू झाला. ही घटना नागपूर ग्रामीणमध्ये घडली. सुकवण मातारे (४५) असे मृत आईचे तर अंजली मातारे (१५) असे मृत मुलीचे नाव आहे. (Nagpur Rural News)

प्राप्त माहितीनुसार, आई सुकवण आणि मुलगी अंजली या दोघेही रात्री कामावरून घरी परत येत होत्या. भीमनगर इसासनी येथील महाबोधी मग्गा विहाराच्या खालच्या भागात असलेल्या घरी जात होत्या. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नाल्यातून कंबरेपर्यंत पाणी वाहत होते. सतत पाणी वाहत असल्याने वहीवाटच्या रस्त्यावर खड्डा पडला होता.

मात्र, या खड्ड्याची आई आणि मुलीला कल्पना नव्हती. याच खड्ड्यात आईचा तोल गेला आणि त्या वाहू लागल्या. आई वाहत जात असल्याचे पाहून मुलगी वाचविण्यासाठी गेली. मात्र, दोघेही नाल्याच्या पाण्यात (Drain) वाहत गेल्या. दोघीजणी वाहत गेल्याची माहिती मिळताच रात्रीच एमआयडीसी पोलिस घटनास्थळी दाखल झाली.

रात्रीच पोलिसांनी दोघांचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र, आईचाच मृतदेह हाती लागला. मुलीच्या मृतदेहाचा शोध अद्यापही पोलिसांकडून घेण्यात येत आहे. बातमी लिहिस्तोर मुलीचा मृतदेह (Death) हाती लागला नव्हता. आई आणि मुलीचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT