MP Navneet Rana will be shifted to Mumbai for further treatment 
नागपूर

मोठी बातमी ः खासदार नवनीत राणा अस्वस्थच, पुढील उपचारांसाठी मुंबईला हलवले

केवल जीवनतारे

नागपूर : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना मागील आठवड्यात कोरोनाची बाधा झाली. त्यांच्यावर अमरावतीच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. अस्वस्थ वाटत असल्यामुळे सोमवारी रात्री उशिरा नागपूरच्या वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. डॉक्टरांनी केलेल्या उपचारांनंतर अद्यापही त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने पुढील उपचार मुंबईत करण्याचा निर्णय घेण्यात आला. गुरुवारी त्यांना मुंबईला हलविल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

आज दिवसभरात त्यांच्या प्रकृतीमध्ये पाहिजे तशी सुधारणा झाली नाही. आमदार रवी राणा नागपूरला आई-वडिलांच्या सेवेत असताना पॉझिटिव्ह आढळले. त्यांनाही वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सध्या संपूर्ण राणा कुटुंबीय वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. तज्ज्ञ डॉक्टरांची चमू नवनीत राणा यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. विशेष म्हणजे, नवनीत राणा यांचे पती आमदार रवी राणा, त्यांचे आई-वडील हे सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह असून त्यांच्यावरही नागपूरला वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये मागील आठवड्यापासून उपचार सुरू आहेत. त्यांच्याच कुटुंबातील इतर सदस्यांवर मात्र अमरावती येथील विविध खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. 

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचा कोरोना रॅपिड टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने चांगलीच खळबळ उडाली होती. आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांच्या कुटुंबातील दहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे मुले तसेच कुटुंबातील सदस्यांकडे लक्ष देण्यात नवनीत राणा व्यग्र होत्या. रवी राणा यांच्या आई-वडिलांवर नागपूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

संपादन : अतुल मांगे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raigad News: पर्यटकांचा हिरमोड! देवकुंड धबधबा, सिक्रेट पॉईंट आणि ताम्हिणी घाट बंद; प्रशासनाचा मोठा निर्णय

काय सांगता? यंदाच्या मान्सूनमध्ये चक्क 'ब्लॅक कार्बन'? संशोधनातून धक्कादायक माहिती समोर...

Pune Property Tax : पुणे महापालिकेची विक्रमी मिळकतकर वसुली: पहिल्या तिमाहीत १३९५ कोटी, गेल्या वर्षीपेक्षा १०२ कोटींची वाढ

IND vs ENG, 2nd T20I: वैभव सूर्यवंशीचं अखेर पदार्पण झालं, पण कोणाला मिळाला संघातून डच्चू? पाहा भारत-इंग्लंडची Playing XI

NCP Sharad Pawar Merger Rumours: राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कॉंग्रेसमध्ये विलीनीकरणाचे चर्चेला शशिकांत शिंदेंचा ठाम विरोध

SCROLL FOR NEXT