mpsc and railway exam on same day
mpsc and railway exam on same day  
नागपूर

एमपीएससीच्या परीक्षेसाठी कोरोना प्रतिबंधक उपाययोजना, पण एमपीएससीची परीक्षा द्यायची, की रेल्वेची?

मंगेश गोमासे

नागपूर : राज्य लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी)१४ तारखेला घेण्यात येणारी परीक्षा आता रविवारी (ता. २१) तारखेला घेण्यात येणार आहे. एमपीएससीची परीक्षा घेण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून नेमण्यात आलेल्या ३८ केंद्रावर कोरोना प्रादुर्भाव होऊ नये या अनुषंगाने सरकारने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सोयी करण्यात आल्या आहेत. मात्र, याच परीक्षेदरम्यान रेल्वे मंडळाची परीक्षा घेण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांना कोणतीही एक परीक्षा देता येणार आहे. 

राज्यभरात एमपीएससीच्या परीक्षा १४ मार्चला घेण्याचे ठरले. मात्र, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, अचानक परीक्षा रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला. मात्र, या निर्णयाविरोधात, उमेदवारांनी आंदोलनाचा पवित्रा स्वीकारला. राज्यभर उमेदवार आणि संघटनांनी आंदोलने केलीत. त्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उमेदवारांना आवाहन करीत एका दिवसात परीक्षेची तारीख जाहीर करण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार दुसऱ्याच दिवशी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्यात. त्यानुसार रविवारी (ता.२१) सकाळी १० ते १२ दरम्यान पहिला तर ३ ते ५ यादरम्यान दुसरा पेपर घेण्यात येणार आहेत. यासाठी जिल्ह्यातून १७ हजारावर उमेदवार परीक्षा देतील. यासाठी प्रत्येक केंद्रावर कोरोनाच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात आलेल्या असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांची यांनी दिली. ज्या उमेदवाराचे तापमान जास्त वाटल्यास त्याला वेगळे बसविण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर एक तास अगोदर पोहचण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. 

कोणतीही एकच परीक्षा देता येणार 
रविवारी आयोजित करण्यात आलेल्या एमपीएससीच्या परीक्षा आणि रेल्वे मंडळाच्या परीक्षा घेण्यात येणार आहे. मात्र, यापैकी रेल्‍वे मंडळाच्या परीक्षांसाठी अमरावती आणि औरंगाबाद या जिल्ह्यात केंद्र देण्यात आले आहेत. याशिवाय एमपीएससीच्या परीक्षांसाठी शहरासह जिल्ह्यात ३८ केंद्राचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे उमेदवारांना कोणतीही एकच परीक्षा देता येणार आहे. 

झेरॉक्ससाठी खेटा -
सध्या पोलीस आयुक्त हद्दीत टाळेबंदी लावण्यात आली आहे. यामध्ये जीवनावश्यक वस्तू सोडून सर्वच दुकाने बंद करण्यात आलेली आहेत. मात्र, परीक्षेसाठी उमेदवारांना पाठविण्यात आलेले प्रवेशपत्र मेलवर असल्याने त्याची प्रिण्ट वा झेरॉक्स करण्यासाठी कुठलीच व्यवस्था नसल्याने उमेदवारांना इतरत्र खेटा घालाव्या लागत आहेत. त्यामुळे एक दिवस झेरॉक्स सेंटर सुरू करण्याची मागणी उमेदवारांकडून करण्यात येत आहे. 

असे आहेत नियम - 

  • परीक्षा केंद्रावर प्रवेश करताना मुखपट्टी अनिवार्य. 
  • परीक्षा कक्षामध्ये मुखपट्टी, हातमोजे व सॅनिटाईजर असलेली किट देण्यात येईल. 
  • कोव्हिड सदृश्य लक्षणे असलेल्यांना पीपीई किट देण्यात येईल. 
  • परीक्षा संपल्यावर शारिरीक अंतर राखणे अनिवार्य. 
     

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED: "जे काही चालले आहे ते अतिशय गंभीर आहे," कोर्टाने ईडीला का फटकारले? वाचा संपूर्ण प्रकरण

Share Market Opening: सेन्सेक्स-निफ्टी किंचित वाढीसह उघडले; सेन्सेक्स 74,600च्या पुढे, कोणते शेअर्स वधारले?

Viral Video: जिममध्ये वॉर्मअप करत असताना अचानक जमिनीवर कोसळला; तरुणाचा हर्ट अटॅकमुळे मृत्यू, पाहा व्हिडिओ

IPL 2024 : प्ले-ऑफमधून इंग्लंडचे खेळाडू बाहेर जाण्यामागे बटलरचा हात; बोर्डाने केला मोठा खुलासा

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

SCROLL FOR NEXT