नागपूर

विदर्भातील ऑक्सिजन प्लांटसाठी उद्योग मंत्रालयाच्यावतीने देण्यात येणार ७० टक्के अनुदान

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : विदर्भात (Vidarbha) ऑक्सिजन निर्मिती प्लांट (Oxygen Plant) स्थापन करण्यासाठी केंद्रीय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्यावतीने (MSME) ७० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. हा पथदर्शी प्रकल्प यशस्वी झाल्यास देशाच्या इतर भागातही त्याचे अनुकरण केले जाणार आहे. (MSME will give 70 percent fund for Oxygen plants in Vidarbha)

एमएसएमईच्या क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेंतर्गत ऑक्सिजन प्लांटची स्थापना करण्यासंदर्भात विदर्भ हॉस्पिटल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची आणि संस्थेचे संचालक डॉ. पी.एम. पार्लेवार यांच्यादरम्यान बुधवारी बैठक झाली. विदर्भ हॉस्पिटल असोसिएशन संघटनेमध्ये शंभरहून अधिक खासगी रुग्णालये नोंदणीकृत आहेत. त्यांना ऑक्सिजनच्या पुरवठ्यात येणाऱ्या अडचणींवर मात करण्यास बैठकीमध्ये खासगी रुग्णालयांच्या क्लस्टरसाठी एमएसएमईच्या क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेंतर्गत ऑक्सिजन प्लांट संदर्भात कॉमन फॅसिलिटी सेंटर स्थापित करण्याच्या शक्यतेवर चर्चा करण्यात आली. नागपुरात ही खासगी रुग्णालये 'सेवा उपक्रम' म्हणून एमएसएमई कायद्यांतर्गत नोंदणीकृत आहेत.

१० कोटी रुपये किमतीचा आणि १७०० सिलिंडर प्रति दिवस पुरवण्याची क्षमता ऑक्सिजन प्लांट स्थापन करण्या संदर्भात बैठकीत चर्चा झाली. याकरिता विदर्भ हॉस्पिटल असोसिएशन या योजनेनुसार स्पेशल पर्पज व्हेईकल (एसपीव्ही) स्थापन करण्यास तयार असल्याचे सांगण्यात आले. या प्रकल्पासाठी आवश्यकतेनुसार १० ते ३० टक्के योगदान खासगी हॉस्पिटल देण्यास तयार आहे. उर्वरित ७० टक्के रक्कम एमएसएमईने अनुदान म्हणून देण्याची तयारी दर्शविली.

या योजनेचा विस्तृत प्रकल्प अहवाल मंत्रालयाकडे सादर केला जाईल. मंजुरीनंतर नागपुरातील खासगी रुग्णालये या सीएफसीकडून सेवा देण्यास सक्षम होतील. तसेच नागपुरात “ऑक्सिजन बँक” म्हणून काम करतील. सीएफसीच्या स्थापनेसाठी जमिनीचा शोध घेणे सुरू आहे. तत्पूर्वी, एमएसएमईच्यावतीने नागपुरात करोना महामारीच्या पहिल्या लाटेच्यावेळी पीपीई किट विकसित केली गेली आणि शासनाला वितरित केली गेली होती.

(MSME will give 70 percent fund for Oxygen plants in Vidarbha)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT