नागपूर

MSRTC Tourism: एसटीच्या ‘पर्यटन बस’ सेवेला कायमचा ब्रेक? तीन वर्षापासून उपक्रम बंद, पर्यटन प्रेमींचा हिरमोड

जिल्ह्यातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळांना भेटी देण्यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी)ने पर्यटन बस सेवा सुरू केली होती.

सकाळ डिजिटल टीम

Nagpur MSRTC Tourism Discontinued: जिल्ह्यातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळांना भेटी देण्यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी)ने पर्यटन बस सेवा सुरू केली होती. मात्र, कोरोनापासून बंद केलेली ही सेवा आता कायमची बंद होणार का? असा सवाल पर्यटन प्रेमी व प्रवाशांकडून होऊ लागला आहे.

नागपूर-भंडारा जिल्ह्याच्या सीमेवरील अंभोरा येथे वैनगंगा नदीवरील केबल-स्टेड पुलाचे लोकार्पण नुकतेच झाले. पर्यटक मोठ्या संख्येने हा आधुनिक पूल बघायला जात आहेत. जिल्ह्यात अनेक पर्यटन स्थळे आहेत.

एसटी प्रशासनाने गणेशपेठ आगारातून अशा काही मोजक्या पर्यटन स्थळांना भेटी देण्यासाठी ‘पर्यटन बस’ सुरू केली होती. यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल, रामटेक गड मंदिर, सुराबर्डी, आदासा, धापेवाडा, रामटेक खिंडसी तलाव आदी आठ स्थळांचा समावेश होता.

सकाळी ८ ते रात्री ८ असा एक दिवसाचा हा बसप्रवास होता. सहलीचा लाभ घेणाऱ्यांनी किमान १ दिवसाआधी बुकिंग करायची होती. एका प्रवाशांसाठी एसटीकडून २२५ रुपये आणि आरक्षणासाठी ५ रुपये असे २३० रुपये आकारल्या जात होते. पूर्वी ऑनलाइन बुकिंगची सुद्धा सुविधा होती. बसमध्ये ४४ सीटची क्षमता आहे. दर रविवारी ही बस गणेशपेठ आगारातून सकाळी सुटायची. (Latest Marathi News)

त्याचप्रमाणे राष्ट्रीय सुटी, सण व उत्सव तसेच मागणीनुसार शनिवारी सुद्धा ही बस असायची. ‘पर्यटन बस’मध्ये ग्रुप बुकिंग, कौटुंबिक प्रवास, सहल, ज्येष्ठ नागरिकांचा गट तसेच नागपूरच्या बाहेरील पर्यटकांकडून सुद्धा या बसची बुकिंग व्हायची. प्रवासी जास्त असल्याने याला दुसऱ्या बसची साथही मिळायची. मात्र, कोरोनापासून बंद झालेली ही सेवा अद्यापही सुरू झालेली नाही.(Latest Marathi News)

‘पर्यटन बस’ ही चांगली सेवा होती. लोकांचा त्याला प्रतिसादही उत्तम होता. मात्र, कोरोनामध्ये ही सेवा बंद झाली. आता या यासंदर्भात आढावा घेऊन विभागाकरिता लवकरच पत्र काढणार आहे.- श्रीकांत गभने, उपमहाव्यवस्थापक- नागपूर व अमरावती विभाग, एसटी महामंडळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

Strait of Hormuz: 'होर्मुझ'चं सोडा, इराणची नवीनच खेळी; अरबी समुद्रापर्यंत ‘रेस्ट्रिक्टेड झोन’ करण्याची योजना, जगावर नवं संकट

SCROLL FOR NEXT