Municipal Corporation issues notice to ten hospitals 
नागपूर

उपराजधानीत शासकीय रुग्णालय कोरोनाबाधितांमुळे "हाउसफूल्ल', आता मदतीसाठी...

राजेश प्रायकर

नागपूर : शहरातील मेयो, मेडिकल, एम्स ही शासकीय रुग्णालय उपचारासाठी असलेल्या कोरोनाबाधितांमुळे "हाउसफूल्ल' झाली आहेत. त्यामुळे दररोज वाढत असलेल्या कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी आता महापालिकेने खाजगी रुग्णालयांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहे. शहरातील दहा खाजगी रुग्णालयांना नोटीस बजावून सज्ज राहण्यासंदर्भात 24 तासांत अहवाल सादर करण्यास महापालिकेने सांगितले. 

शहरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे. दररोज दीडशे रुग्ण पुढे येत आहे. मेयो, मेडिकल, एम्समध्ये आता एकाही रुग्णासाठी जागा शिल्लक नाही. आमदार निवासातही काही रुग्णांना ठेवण्यात आले असून तिथेही खाटा संपुष्टात आल्या. शहरात 3700 कोरोनाबाधित आढळले असून यापैकी 2300 कोरोनामुक्त झाले आहे. आता 1310 सक्रिय कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहे.

यापैकी 369 रुग्ण आमदार निवासात तर मेयोत 360 आणि मेडिकलमध्ये 264 जणांवर उपचार सुरू आहे. येथील रुग्ण ठेवण्याची मर्यादा संपुष्टात आली. त्यामुळे महापालिकेने खाजगी रुग्णालयांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेने शुक्रवारी दहा खाजगी रुग्णालयांना नोटीस बजावून डेडीकेटेड कोव्हीड हॉस्पिटल (डीसीएच) सज्ज ठेवण्याचे निर्देश दिले. कोरोनाग्रस्तांना ठेवण्याबाबत रुग्णालये सज्ज असल्याबाबतचा अहवाल 24 तासात सादर करण्याचे निर्देश महापालिकेने दिले आहे. विशेष म्हणजे अहवाल सादर केल्यानंतर तत्काळ या दहाही हॉस्पिटलमध्ये कोरोनाग्रस्तांना तत्काळ भरती करण्यात येणार आहे. 

या रुग्णालयांत होणार उपचार 
महापालिकेने सज्ज राहण्यासंदर्भात नोटीस दिलेल्या दहा रुग्णालयांमध्ये ग्रेट नाग रोडवरील सेव्हन स्टार हॉस्पिटल, वर्धमाननगरातील राधाकृष्ण हॉस्पिटल, सिताबर्डीतील लता मंगेशकर हॉस्पिटल, पूनापूर, पारडीतील भवानी मल्टीस्पेशालिटी, रामदासपेठेतील गंगा केअर हॉस्पिटल, मानकापुरातील कुणाल व ऍलेक्‍सिस, मोहननगरातील व्हीआयएमएस, सावरकरनगरातील ऑरेंज सिटी, शंकरनगरातील वोक्‍हार्ट हॉस्पिटलचा समावेश आहे. या रुग्णालयांत कोरोनाग्रस्तांवर उपचार होईल. 

(संपादन : प्रशांत राॅय)
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sachin Yadav: नीरजलाही मागे टाकणारा कोण आहे सचिन यादव? पोलिस भरतीनंतर भालाफेक सोडण्याचा केलेला विचार, पण...

Mamata Banerjee: ८४० कैदी तुरुंगातून मुक्त! विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांचा निर्णय, नेमकं कारण काय?

Latest Maharashtra News Updates : पुण्यात मुसळधार पाऊस; बाणेर-औंध रस्ता वाहतुकीसाठी अजूनही ठप्प

Malkapur Accident : भरधाव मारुती इको कारची समोर चालणाऱ्या ट्रेलरला पाठीमागून जोरदार धडक; ५ जणांचा मृत्यू , ४ जण गंभीर जखमी

Chikhali Accident : शिक्षक आमदाराच्या गाडीने तरुणास उडविले; तरुण गंभीर जखमी होऊन सध्या कोमात

SCROLL FOR NEXT