नागपूर

भाजपला जनता फळ म्हणून नारळ देणार; काँग्रेसचा गडकरींवर शरसंधान

राजेश चरपे

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या आवाहनानुसार महापालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या नगरसेवकांना विकासकामांची पावती म्हणून जनता पदवीधर निवडणुकीप्रमाणे बक्षीस देणार आहे. नारळ हेच फळ भाजपसाठी सर्वाधिक योग्य असल्याची टीका काँग्रेसचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी केली.

काँग्रेसची प्रदेश कार्यकारिणी जाहीर होताच पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन थेट गडकरी यांच्यावरच शरसंधान साधून महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शंखनाद केला. भाजपने पंधरा वर्षे महापालिकेत जो गोंधळ घातला, कोट्यवधींचा चुराडा केला, मनमानी कारभार केला, त्याचे फळ म्हणून यंदा जनता त्यांना नारळ देणार आहे.

ज्याची गरज नाही असे कोट्यवधींचे बिनकामाचे प्रकल्प भाजपने आपल्या कार्यकाळात राबवले. यामागचा हेतू काय हे वेगळे सांगण्याची गरज नाही. सध्या सर्वाधिक समस्या बेरोजगारीची आहे. केंद्रात आणि राज्यात सत्ता असताना मिहान प्रकल्प विकसित केला असता तर शेकडो लोकांना रोजगार उपलब्ध झाले असते.

मात्र, भाजपने नागनदी, सिमेंट रोड, सौंदर्यीकरण यातच जास्त स्वारस्य दाखविले. त्यावरून भाजपला सर्वसामान्यांच्या समस्या, प्रश्नासंबंधी काही देणे घेणे नसल्याचे स्पष्ट होते, असाही आरोप ठाकरे यांनी केला. पत्रकार परिषदेला नवनिर्वाचित पदाधिकारी हैदरअली दोसानी, कमलेश समर्थ, संदेश सिंगलकर, नंदा पराते, अतुल कोटेचा, गिरीश पांडव, प्रशांत धवड आदी उपस्थित होते.

पारडी पुलाची चौकशी करा

महामंत्री अभिजित वंजारी यांनी पारडी उड्डाणपूल आणि आउटर सिमेंट रोडचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे सांगितले. सिमेंट रोडवर जागोजागी खड्डे पडले आहेत. पारडी पुलाची डेडलाईन संपली आहे. मात्र, कंत्राटदाराला वारंवार मुदतवाढ दिली जात आहे. या पुलाने आतापर्यंत सात जणांचे बळी घेतले. त्यांना नुकसान भरपाई देण्यात आली नाही. याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी अभिजित वंजारी यांनी केली.

पाच कोटी कोणी परत केले

मनात येईल तो प्रकल्प राबवण्याचा सपाटा भाजपचा सुरू आहे. तो व्यवहार्य आहे की नाही, त्याचे फायदे, तोटे याचाही विचार केला नाही. नंतर ते प्रकल्प गुंडाळावे लागले. त्यामुळे कोट्यवधीचा चुरडा झाला. कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्पाने गाशा गुंडाळला आहे. एस.एल. ग्रुपची पाच कोटींची बँक गॅरंटी मनपाने कोणाच्या सांगण्यावरून परत केली याचे उत्तर द्यावे, अशी मागणी विशाल मुत्तेमवार यांनी केली.

बांधा आणि खोदा हाच उद्योग

महासचिव उमाकांत अग्निहोत्री यांनी सिमेंट रोडच्या कामातील अनियमितता आणि डुप्लिकेशन वर्ककडे लक्ष वेधले. डिप्टी सिग्नल येथे आधी सिमेंट रोड बांधला. त्यानंतर केबल टाकण्यासाठी पुन्हा खोदला. ड्रेनेजमध्ये उभे असलेले ट्रांसफार्मर तसेच ठेवल्याचे सांगितले. भाजप नेत्यांच्या नातेवाइकांचे कंत्राट असल्याने मनपातील अधिकारी चुप्पी साधून असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

MLA Prakash Solanke : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला प्रकाश सोळंके यांचा पाठिंबा; सोशल मीडियावर 'मी येतोय तुम्ही या'चे आवाहन

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

SCROLL FOR NEXT