Murder by beating him to death and throwing him into a well Nagpur murder news 
नागपूर

‘अबे ये तो मर गया..कुवे में फेक दो’; एकाला बेदम मारहाण करून खून, दोघांना अटक

अनिल कांबळे

नागपूर : वस्तीत दादागिरी करणाऱ्या युवकांनी एका व्यक्तीचे घरातून अपहरण करून बेदम मारहाण केली. बेशुद्ध पडल्यानंतर त्याला विहिरीत ढकलून खून केला. ही थरारक घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास जरीपटक्यात उघडकीस आली. शैलेश ऊर्फ लड्या कन्हैयालाल बोदेले (३७, रा. इंदोरा चौक झोपडपट्टी) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून अद्याप एक फरार आहे. आशीष ऊर्फ दगडू बागडे (२९, रा. रिपब्लिकननगर) आणि जसपाल सिंह ऊर्फ मोनू पाजी रंजीतसिंह संदूरी (२८, रा. पंजाबी लाईन) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. तर गोलू ऊर्फ ऋषीकेश लांडगे फरार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोनू पाजी याने जरीपटक्यात गॅंग तयार केली आहे. धमकावणे आणि खंडणी वसूल करण्यासाठी ती टोळी प्रयत्न करते. अवैध धंदेवाल्यांकडून हप्ता घेते. काही दिवसांपूर्वी शैलेश याचा भाचा रिषभ खोब्रागडे याच्यासोबत वाद झाला होता. रिषभने मोनूपाजीला धमकी दिली होती. त्यामुळे त्याने बुधवारी रात्री बारा वाजता शैलेषची भेट घेतली. त्याने सोबत गोलू आणि आशीषला नेले होते. त्याला दारू पाजली. त्यानंतर तिघांनीही शैलेशला भाचा रिषभची समजूत घाल नाही तर त्याचा ‘गेम’ करावा लागेल, अशी धमकी दिली. त्यामुळे शैलेश चिडला.

भाच्याला ठार मारण्याची भाषा वापरल्यामुळे शैलेषने तिघांनाही शिवीगाळ केली. त्यामुळे चिडलेल्या मोनू पाजी याने त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. तिघांनीही शैलेषला बेदम मारले आणि तेथून पळ काढला. काही वेळानंतर पुन्हा मोनू पाजी शैलेषच्या घरी आला.

एकटा असलेल्या शैलेषला तिघांनीही दुचाकीवर बसवून श्रावस्ती विहाराजवळ नेले. तेथे तिघांनीही पुन्हा मारहाण केली. दारूच्या नशेत असलेला शैलेश बेशुद्ध पडला. त्यानंतर तिघांनीही शैलेषला विहिरीत फेकून ठार केले. जरीपटका पोलिसांनी हत्याकांडाचा गुन्हा दाखल करून दोन आरोपींना अटक केली असून अद्याप एक फरार आहे.

‘अबे ये मर गया... फेक दे’

मोनू पाजी, गोलू आणि आशीष यांनी शैलेषला बेदम मारहाण केली. त्‍यांच्या मारहाणीत शैलेश बेशुद्ध पडला. ‘अबे ये तो मर गया..कुवे में फेक दो’ असे मोनू म्हणाला. त्यामुळे पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपींनी बेशुद्ध पडलेल्या शैलेषला विहिरीत ढकलून दिले. त्यातच शैलेषचा मृत्यू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bandra Encroachment Drive : प्रार्थनास्थळावरील कारवाईच्या वृत्ताने वांद्र्यात तणाव! थेट पोलिसांवरच तुफान दगडफेक; कर्मचारी जखमी, जातीय रंग देण्याचा प्रयत्न

ऐनवेळी लोकलने बदलला प्लॅटफॉर्म, पोहोचली एक्सप्रेसच्या प्लॅटफॉर्मवर; प्रवाशांची तारांबळ, रेल्वेचे म्हणणे काय?

अंब्याची बाग, घावणे आणि बरंच काही... पुजा सावंतच कोकणातील 'या' ठिकाणी आहे घरं, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

Makhan Mishri: श्रीकृष्णाचा अद्भूत नैवेद्य! अवघ्या काही मिनिटांत घरीच बनवा मलाईदार माखन-मिश्री; पाहा काय आहे सोपी पद्धत!

Bandra East Demolition : वांद्र्यातील कारवाईला हिंसक वळण, सात पोलिसांसह तीन आंदोलक जखमी; 5,300 चौरस मीटर जागेवरील 60 टक्के अतिक्रमण जमीनदोस्त

SCROLL FOR NEXT