murder of the husband who was an obstacle in love was committed by his wife
murder of the husband who was an obstacle in love was committed by his wife 
नागपूर

विश्वासाला तडा... प्रियकराच्या मदतीने पत्नी करत होती पतीचा खून अन् पाच वर्षांचा मुलगा उघड्या डोळ्याने बघत होता

अनिल कांबळे-सतीश दहाट

नागपूर-कामठी : प्रेम आंधळं असतं, असे म्हटले जाते ते काही खोटे नाही. एखाद्याच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या व्यक्तीला स्वतःच्या कुटुंबाचाही विसर पडतो. तसेच वैवाहिक जीवनात विश्वास मोठा असतो. पण, विश्वासाला तडा गेला तर जीव ही गमवावा लागतो. हृदय पिळवटून टाकणारी अशीच एक घटना उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण कामठीत खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीने खून केल्याची धक्कादायक घटना कामठी नगर परिषदेच्या पाण्याच्या टाकीसमोरील भीमनगरात गुरुवारी मध्यरात्रीला घडली. मृत राजू हरिदास कुकुर्डे (वय ३७, रा. पाण्याच्या टाकीसमोर, भीमनगर) हा आरोग्य विभागात परिचारकपदी कार्यरत आहे. मारेकरी पत्नीने प्रियकर व प्रियकराच्या भावाच्या मदतीने पतीचे हात बांधून आणि तोंडाला उशीने दाबून हत्या केली. याप्रकरणी नवीन कामठी पोलिसांनी आरोपी शुभांगी राजू कुकुर्डे (३०), रूपेश दिलीप विरहा (३५, रा. उपजिल्हा रुग्णालय वसाहत कामठी), हरिचंद्र राजेंद्र बिरहा (३४, रा. बोरियापुरा, कामठी) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून सर्व आरोपींना अटक केली आहे.

वर्धा बरबडी गावातील राजूला दहा वर्षांपूर्वी आरोग्य विभागात चतुर्थ श्रेणी संवर्गातील परिचारकपदावर नोकरी मिळाली. घरच्यांनी अवघ्या एका वर्षानंतर लग्न करण्याचे ठरविले. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील शुभांगीशी २ मे २०१३ रोजी लग्न करून दिले. राजूची नोकरी येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात असल्याने उपजिल्हा रुग्णालयातील शासकीय निवासस्थानी पत्नीला घेऊन राहू लागला. या वसाहतीत इतरही कर्मचारी वास्तव्यास होते. राजू व शुभांगीच्या वैवाहिक जीवनात आठ वर्षीय कलश नावाचा मुलगा आहे. सुखाने संसार सुरू असताना पत्नी शुभांगीचे वसाहतीतील रूपेशसोबत सुत जुळले आणि हा घटनाक्रा घडला.

कौटुंबिक सुखासाठी सोडले घर

राजू शासकीय उपजिल्हा रुग्णालयात परिचारकपदी कार्यरत होता. राजू कामठी नगर परिषदेच्या पाण्याच्या टाकीसमोरील भीमनगरात पत्नी शुभांगी व पाच वर्षांच्या मुलासह राहत होता. शुभांगीचे घराजवळच राहणाऱ्या आरोपी रूपेश याच्याशी प्रेमसंबंध होते. रूपेशसुद्धा विवाहित असून, पत्नी व तीन मुलांसह राहत होता. शुभांगी व रूपेशने सीमेपलीकडे मर्यादा ओलांडल्यानंतर त्यांच्या प्रेमसंबंधाबाबत राजूला कुणकुण लागली. या काराणातून राजू व शुभांगी या दोघांत चांगलेच भांडण व्हायचे. वादाला विराम देत कौटुंबिक सुखासाठी सहा महिन्यांपूर्वी राजूने शासकीय वसाहत सोडून भीमनगर येथे भाड्याने घर घेतले. त्या दोघांचा संसार सुरळीत असतानाच पुन्हा आरोपी रूपेश व शुभांगीचे सुत जुळले. यामुळे पुन्हा राजू व शुभांगीच्या कुटुंबात कलह निर्माण झाले. बुधवारी रात्रीला शुभांगी व राजूचे कडाक्याचे भांडण झाले.

अशी आखली योजना

नेहमीच्या या भांडणाचा अखेर करण्याची योजना रूपेश व शुभांगीने आखली. राजूचा काटा काढण्यासाठी रूपेशने त्याचा चुलत भाऊ हरीचंद्र यालाही सामील केले. गुरुवारी नेहमीप्रमाणे रात्रीचे जेवण आटोपून शुभांगीने झोपेचे सोंग केले. यानंतर मध्यरात्रीला शुभांगीने संधी साधून रूपेश व हरीचंद्र यांना घरात बोलावून घेतले. रात्री दोन वाजताच्या दरम्यान सर्व आरोपीतांनी राजूचे हात बांधून तोंडावर उशी ठेवून जीवानिशी ठार केले.

पाच वर्षांचा चिमुकला झाला पोरका

मृतकाने स्वतःचा जीव वाचविण्यासाठी केलेल्या आरडाओरडची आवाज परिसरातील नागरिकाला पोहोचताच. त्याने त्वरित नवीन कामठी ठाण्याचे डीबी स्कॉडचे पप्पू यादव व मंगेश लांजेवार यांना माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले आण सर्व आरोपीताना रंगेहात अटक केली. तिन्ही आरोपीना ताब्यात घेत त्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविला. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह पुढील उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह शासकीय उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. पुढील तपास सुरू आहे. प्रेमाच्या आंधळ्या भावनेत ५ वर्षांचा मुलगा बापाच्या आश्रयातून कायमचा दूर झाला.

बाहेरून दार बंद केल्याने तिन्ही ओरोपी सापडले

मृतकने जीव वाचविण्यासाठी आरडाओरड केली. त्याचा आवाज रस्त्यावरून जाणाऱ्या युवकाला आला. युवकाने जाऊन बघितले असता रूमच्या आत काहीतरी होत असल्याचे दिसले. युवकाने बाहेरून दार बंद केले. हे मारेकऱ्यांना कळू शकले नाही. दार बंद करताच पोलिसांना फोनवरून सूचना दिली. नवीन कामठी पोलिस ठाण्याजे डीबी स्कॉडचे पप्पू यादव व मंगेश लांजेवार यांना माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचले. दार उघडून बघताच पलंगावर राजूचे प्रेत दिसले. तर राजूची पत्नी तिचा प्रियकर व त्याचा एक साथीदार खोलीत मिळाला.

आरोपी आईच्या कुशीत बसून मुलगा रडत होता

राजूचा खून होताना पाच वर्षांचा मुलगा उघड्या डोळ्याने बघत होता. आज तो अनाथ झाला असून, नवीन कामठी पोलिस ठाण्यात आरोपी आई शुभांगीच्या कुशीत बसून रडत होता. घटनेची माहिती राजूचे वडील हरीचंद कोकुरडे, लहान भाऊ व इतर नातेवाईक मिळताच दुपारी एक वाजता सुमारास उपजिल्हा रुग्णालयात हजर झाले. राजूचे प्रेत बघून घायमोकलून रडत होते.

मुलाला सोबत नेता आले नाही

कुटुंबीय अंत्यसंस्कार करण्यासठी राजूचा मृतदेह बरबडी जिल्हा वर्धा येथे घेऊन गेले. पाच वर्षांच्या मुलाला सोबत नेण्यासाठी ते पोलिसांना विनंती करीत होते. परंतु, न्यायालयाच्या आदेशानुसार मुलाला देता येणार नसल्याचे ठाणेदार राधेश्याम पाल यांनी सांगितले.

संपादन : अतुल मांगे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ujjwal Nikam: "माझा जन्म हनुमान जयंतीचा", 'मविआ' उमेदवाराला कसं रोखणार या प्रश्नावर निकमांचा थेट युक्तिवाद

Ujjwal Nikam: उज्ज्वल निकम यांना भाजपकडून मुंबई उत्तर-मध्यमधून उमेदवारी जाहीर; पुनम महाजन यांचा पत्ता कट

IPL 2024 DC vs MI Live Score : मुंबईला दुसरा धक्का! रोहितपाठोपाठ ईशान किशनही परतला माघारी

Pune News : पुण्याचे माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांचे दीर्घ आजाराने निधन

Lok Sabha Election 2024 : भिवंडीत ‘तुतारी’ला सूर गवसेना; मित्रपक्षाच्या ‘हाता’ने वाढवली डोकेदुखी

SCROLL FOR NEXT